Manipur Churachandpur Sp Office ttack:एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ४०० ते ५०० जणांच्या जमावाने एसपी ऑफिसवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमवाला प्रत्युत्त देतांना सुरक्षा दल व रॅपिड ॲक्शन फोर्सने श्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दि १५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ४००ते ते ५०० लोकांच्या जमावाने मणिपूरच्या चुराचांदपुर येथील एसपी कार्यालयाला घेरले. अनेकांनी कार्यालयावर दगडफेक केली तर अनेकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवत मोठी जाळपोळ केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दल व रॅपिड ॲक्शन फोर्सने जमाव पागवण्यासाठी श्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी झाले आहेत.