spot_img
अहमदनगरAhmednagar: अर्बन मध्ये ट्विस्ट पे ट्विस्ट!! अंदानी आणि गांधी यांचे 'ते' व्यवहार...

Ahmednagar: अर्बन मध्ये ट्विस्ट पे ट्विस्ट!! अंदानी आणि गांधी यांचे ‘ते’ व्यवहार संशयास्पद

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट शंकर घनश्यामदास अंदानी यांचे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रॉडट्स व कर्जदार पटियाला हाऊससोबत सुमारे आठ लाखांचे संशयास्पद व्यवहार असल्याचा दावा, आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. दरम्यान, अंदानी याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संदीप मिटके करत असून, त्यांनी सीए अंदानी याला बुधवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर मिटके यांनी फॉरेन्सिक ऑडिटमधील आक्षेपांची माहिती दिली. अंदानी याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग आहे. तो बँकेत स्विकृत तज्ज्ञ संचालक होता. अंदानी याचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेअरमन दिलीप गांधी (मयत) व इतर आरोपी कुटुंबियांसमवेत जवळचे संबंध आहेत. गांधी कुटुंबीय संचालक असलेल्या विरा लीड लाईट्स व मनसुख मिल्क प्रॉडट्स या कंपन्यांचे ऑडीट रिपोर्ट त्याने केलेले आहेत. मेसर्स मनसुख मिल्क कंपनीच्या बँक खात्यावरुन त्याच्या खात्यात २ लाख रुपये वर्ग झाले. तसेच, अंदानी याने गुन्ह्यातील थकीत कर्जदार पटीयाला हाऊसच्या बँक खात्यामध्ये ६ लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. हा व्यवहार संशयास्पद असल्याचे न्यायलायत सांगितले.

अंदानी याने स्वतःच बाजू मांडत हा व्यवहार अर्बन बँकेशी संबंधित नसल्याचा दावा केला. तसेच, संचालक मंडळाच्या फक्त चार बैठकांना उपस्थित होतो व या वेळी एकही कर्ज मंजूर झालेले नाही, असा दावा अंदानी याने केला. दरम्यान, आरोपीविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याने पुन्हा आर्थिक अपहाराचा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

शहर बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात जामिनावर सुटका झालेल्या सीए विजयकुमार मर्दा याचा अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सहभाग असतानाही त्याला वर्ग करून न घेतल्याचा आक्षेप बँक बचाव समिती व ठेवीदारांनी न्यायालयात घेतला होता. याबाबत म्हणणे मांडताना सीए मर्दा याच्या शोधासाठी ’लूक आऊट नोटीस’ काढत असल्याचे तपासी अधिकारी मिटके यांनी सांगितले. तसेच, शहरातील ५८ आरोपींच्या मालमत्तांची माहिती संकलित करत असून, माहिती मिळताच पुढील कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...