spot_img
अहमदनगरमातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
पारनेर |नगर सहयाद्री:-
शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. लोकसभेला आम्ही मोठे मताधिक्य पक्षाच्या माध्यमातून दिले असून मातोश्रीचा व पक्षाचा उद्या आदेश प्राप्त झाल्यास पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाची पारनेर तालुकाप्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी मत व्यक्त केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मशाल यात्रा तसेच शिवसंवाद मेळावे व भगवा सप्ताह पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने तालुक्यात ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ढवळपुरी, भाळवणी, पारनेर, सुपा, आळकुटी, रांधे, देसवडे, हिवरे कोरडा, या ठिकाणी आरोग्य शिबिर शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वृद्धाश्रमातील वृद्धांना किराणा तसेच वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या समवेत शिवसेना नेते माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेना नेते पोपट चौधरी, युवा सेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, महिला तालुकाप्रमुख प्रियांकाताई खिलारी, महिला उपतालुका प्रमुख कोमलताई भंडारी, विभाग प्रमुख सखाराम उजघरे, राजूशेठ शेख, किसन सुपेकर, युवा सेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश रोहकले, संतोष साबळे, संदीप आवारी, भाऊसाहेब टेकुडे, उद्योजक प्रमोद पठारे, डॉ. बाळासाहेब पठारे संदीप कोरडे, शिवाजी दळवी, पारनेर युवा सेना शहर प्रमुख मनोज व्यवहारे, संदीप मोढवे ज्ञानेश्वर औटी, मोहन पवार, नागेश नरसाळे, दत्ता टोणगे, किसन चौधरी, संतोष रोकडे, दौलत सुपेकर, महेंद्र पांढरकर, सुभाष भोसले, बाबासाहेब नऱ्हे, संदीप भंडारी, शरद घोलप, शरद आवारी, संपत लामखडे, विठ्ठल जाधव, अक्षय गोरडे, सुयोग टेकुडे, शुभम गोरडे, आदी शिवसैनिकांनी पारनेर तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम घेतले.

लोकसभेच्या मदतीची विधानसभेच्या रुपाने परतफेड करा
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना खासदार करण्यामध्ये पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अपार कष्ट घेतले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पारनेर नगर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला देऊन व महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार या ठिकाणी करून भगवा झेंडा पुन्हा फडकवावा व लोकसभेला झालेल्या मदतीची विधानसभेच्या रूपाने परतफेड करावी अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केली आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या या भावनेचा विचार करतात का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...