spot_img
अहमदनगरमतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा लढवणार: सागर बेग

मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा लढवणार: सागर बेग

spot_img

श्रीरामपूर | नगर सह्याद्री:-
श्रीरामपूर मतदारसंघ कायम हिंदुत्ववादी उमेदवाराच्या हातातून गेलेला आहे. त्याची कारणे देखील तशीच आहे. सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुणीही बोलायला तयार नाही. हिंदुत्ववादाची कामे मार्गी लावण्यासाठी विधानसभेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. भाजप अथवा शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्रीरामपूर शहरात गुरुवार दि.24 रोजी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे आकाश बेग, पत्रकार समीर माळवे, अंकुश जेधे, सुनील पाचोने, कुष्णानंद महाराज, रवि जाधव, लखन माखेजा, रोहित यादव आदीं उपस्थित होते.

सागर बेग म्हणाले, महाराष्ट्र राज्यासह श्रीरामपूर राखीव विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत वाल्मिकी समाजाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. मात्र, आपण कुठलीही जात मानत नाही. आज हिंदू समाजासाठी लढा उभारला आहे. जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात लव्ह जिहादसारखे प्रश्न उद्भवत आहेत. त्यात अनेक लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यासाठी आंदोलन, मोर्चाचे हत्यारही आपण उपसले असून आजही लव्ह जिहाद प्रकरणी न्याय मागत आहोत. हिंदूंचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मुद्द्यावर आजपर्यंत कुठलाही राजकीय व्यक्ती बोलायला तयार नाही.

मला उमेदवारीसाठी कोल्हापूर येथील राजेंचे वंशज संभाजीराजे व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवतयांनी संपर्क साधला आहे. याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना संपर्क केला आहे. जरी आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरीही हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठीच आपण उमेदवारी करणार असून या निवडणुकीसाठी सर्व स्तरांतील हिंदुंबरोबर साधुसंतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, नामांकित साधूसंतही माझ्या प्रचाराला येणार असल्याचे बेग यांनी सांगितले.

संधी मिळाल्यास सोने होणार!
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरुण वर्ग नोकरीच्या शोधात पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे वळत आहे. त्यामुळे तरुण वर्गचे प्रश्न सोडविण्यासाठी तरुण आमदाराची गरज आहे. तसेच श्रीरामपूर मतदारसंघात लव जिहाद तसेच धर्मांतरांच्या घटनांना संघामार्फत वाचा फोडण्यात आली आहे. यापुढे देखील हिंदुत्ववादाची कामे मार्गी लावण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्याची गरज आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे सागर बेग यांना संधी मिळाल्यास सोने होणार अशी भावना तरुण वर्ग व्यक्त करीत आहे.

वाड्यावस्त्यांवरील प्रश्न माग लागणार!
राष्ट्रीय श्रीराम संघ धार्मिक कार्य करणारा संघ आहे. हिंदुत्ववादी विचार घराघरांत रुजवण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाची स्थापना करण्यात आली आहे. श्रीरामपूरसह इतर तालुक्यांत श्रीराम संघाच्या 30 शाखा आहेत. श्रीराम संघाने तीन वर्षांत हिंदुत्ववादीच्या विविध मुद्द्यावर जवळपास 70 आंदोलने केली. त्यामुळे सागर बेग यांना संधी मिळाली तर शहरातीलच नव्हे तर वाड्यावस्त्यांवरील प्रश्न मार्गी लागतील अशी चर्चा मतदारसंघात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...