spot_img
अहमदनगरविधानसभा संपली आता मनपा, झेडपी! मतदारयादी, प्रभाग, गट, गण फेररचनेकडे सर्वांचे लक्ष

विधानसभा संपली आता मनपा, झेडपी! मतदारयादी, प्रभाग, गट, गण फेररचनेकडे सर्वांचे लक्ष

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ नुकतीच विधानसभा निवडणूकही संपली आहे. त्यामुळे गाव, तालुका व जिल्ह्यातील पुढाऱ्यांना महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहेत. आगामी सहा महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर मागील दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करणे यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील तब्बल 622 संस्थांची निवडणूक सध्या प्रलंबित आहे. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभागांची सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र राजयात आलेल्या महायुतीने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या पूर्ववत करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातील इतरही विविध मुद्द्यांवर याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिका बराच काळ प्रलंबित असल्याने या निवडणुकांना विलंब होत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत निर्णय होणार आहे. मतदार यादी नव्याने करावी लागणार की आहे तीच राहणार, ओबीसी आरक्षणाचे काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील महापालिका 27, नगरपालिका 243, नगरपंचायती 37, जिल्हा परिषद 26 आणि पंचायत समिती 289 अशा एकूण 622 संस्था निवडणुकीस पात्र आहेत.

मार्च-एप्रिलमध्ये सर्वच निवडणुकांचा धुमधडाका
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची मुदत संपूण तेथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या निवडणुका केव्हा होतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकी पार पडल्या असल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल असे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये घेतल्या जावू शकतात असा अंदाज बांधला जात आहे.

इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांच्या विजयासाठी महापालिका, जिअल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. नेत्याचा विजयी जल्लोषही साजरा केला. त्यामुळे उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडेल असे गृहीत धरुन इच्छुकांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तर काही जण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांची उंबरे झिजवत मनधरणी करत असल्याचे वास्तव आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपचं सरकार, त्यामुळे अण्णा हजारे यांना अजार..?, म्हणून ते आराम करत आहेत; रोहित पवारांनी साधला निशाणा

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील,...

अखेर ठरलं! अधिकृत घोषणा बाकी! पटोलेंचे निवडणूक आयोगाला भलतेच पत्र

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास निर्णय झाले आहेत. याविषयी...

अण्णा झोपले; बाबांचे आत्मक्लेष! खा. संजय राऊत यांनी साधला निशाणा

मुंबई | नगर सह्याद्री:- आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा...

मंत्रीमंडळ लांबणीवर..! कारण काय? वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या...