spot_img
अहमदनगरनीलक्रांती चौकात दोन गटात राडा! कारण काय?

नीलक्रांती चौकात दोन गटात राडा! कारण काय?

spot_img

दोन गट भिडले | फिर्यादी दाखल | चार जखमी, ६१ जणांवर गुन्हे

अहमदनगर | नगर सह्याद्री
दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी (दि.१२) रात्री या चौकात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान गाणे लावण्यावरून मोठा वाद झाला. दोन गट आपसात भिडले. दांडके, कोयत्याने परस्परांवर वार करण्यात आले. यावेळी तोडफोड करून खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यात चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रविराज अजय साळवे याच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसर्‍या गटाचे राहुल अजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पठारे याच्यासह २४ जणांवर गुन्हे झाले आहेत.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली व तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल अजय साळवे (रा. बालिकाश्रम रोड, नीलक्रांती चौक, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. १२ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम गितांचा कार्यक्रम सुरू असताना सदर कार्यक्रमात सनी कांबळे, अंकुश कांबळे, सागर रोकडे, गौरव गायकवाड, अमोल गायकवाड, प्रतीक बारस्कर, अभी लोणारे, आकाश कांबळे यांच्या सांगण्यावरून विजय पठारे, राहुल झेंडे, रोहित कुचेकर, करण पाचारणे, सनी राजेंद्र पाथरे, सुमीत विजय शिंदे, अव्दित दिनेश शिंदे, राज चावरे (सर्व रा. सिध्दार्थनगर, नगर) हे त्यांच्यासोबत आणखी काही सात ते आठ इसम आले. कार्यक्रमाच्या स्टेजवर हातात पाईप, लाकडी दांडके व चाकु घेऊन येऊन आमचे लहुजींचे गाणे लावा, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून विजय पठारे याने त्याच्या हातातील चाकुने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोयात चाकु मारून मला तसेच एकनाथ गायकवाड, प्रतीक शिंदे यांना जखमी केले.

तसेच इतरांनी दहशत निर्माण करून शिवीगाळ करत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. विजय राजु पठारे (रा. सिध्दार्थनगर, नगर) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, दि. १२ रोजी रात्री नऊच्या सुमारास नीलक्रांती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील स्टेजवर गेलो असता, तेथे महापुरूषांचे फोटो खुर्चीवर पुजनाकरीता ठेवलेले होते.

त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटो न दिसल्याने, त्यांचा फोटो का ठेवला नाही, अशी मी अजय साळवे यांना विचारणा केली असता, त्याचा राग आल्याने अजय साळवे याचा मुलगा याने मला स्टेजवरून खाली ओढून त्याच्या हातातील तलवारीच्या उलट्या बाजुने माझ्या खांद्यावर मारले तसेच गौरव साळवे याने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील चॉपरने माझ्या डोयावर उजव्या बाजुला मारले. त्यात माझ्या डोयाला दुखापत झाली आहे. तसेच येथे उपस्थित असलेले अजय साळवे, भप्या भोसले, बुग्गा उर्फ रूपेश तुळशीराम गायकवाड व इतर सात ते आठ अनोळखी (सर्व रा. नीलक्रांती चौक, नगर) यांनी मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला अन्…

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून...

सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय ; माजी आमदारपुत्राचं अजित पवारांना खुले आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं

सोलापूर / नगर सह्याद्री - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक...

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...