spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा अवकळीचे संकट!! 'या' भागात थंडी तर 'त्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: पुन्हा अवकळीचे संकट!! ‘या’ भागात थंडी तर ‘त्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

नवी दिल्ली-
देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शयता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शयता आहे. यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३) दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसा आकाश निरभ्र राहण्याची शयता आहे.

धुयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात किमान तापमान ३ ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान होते. दतिया (पश्चिम मध्य प्रदेश) येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे कडायाची थंडी आहे. मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे.

पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही भागांत २३, २४ तारखेला तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...