spot_img
ब्रेकिंगअज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! 'या' रोडवर भीषण अपघात..

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

spot_img

पाथर्डी | नगर सहयाद्री
पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या विजयकुमार लुणावत (वय अंदाजे 65) व त्यांचा मुलगा विनीत लुणावत (वय अंदाजे 40) यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सध्या ते अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

वामनभाऊनगर, शेवगाव रोड येथील रहिवासी लुणावत पिता-पुत्र मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. वॉकवरून परतत असताना, पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघेही हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत, दोघांना पाथर्डीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघाताला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जबाबदार असावी, अशी शक्यता आहे. मात्र अद्याप वाहनाची ओळख पटलेली नाही. पोलीस तपास सुरू असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे. हा रस्ता पाथर्डीतील नागरिकांसाठी मुख्य मॉर्निंग वॉक मार्ग मानला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर एका महिलेला भरधाव वाहनाने उडवल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

20 कोटी मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाखांना चुना!

जयंत कंठाळे, सागर ऊर्णे, योगेश घुले, गणेश शिंदे यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा अहिल्यानगर | नगर...

भिकारी सरकार! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

रमी व्हिडीओनंतर पत्रकार परिषदेत सरकारलाच ठरवले 'भिकारी', विरोधक आक्रमक नाशिक | नगर सहयाद्री:- राज्याचे कृषीमंत्री...

एमआयडीसीत भयंकर प्रकार; धारदार कोयत्याने हल्ला..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गजराजनगर, काळा माथा परिसरात जुन्या वादातून सात जणांनी मिळून एका व्यक्तीवर...

सरपंच पदासाठी बुधवारी, गुरुवारी आरक्षण सोडत; वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गाव पातळीवरील राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुन्हा एकदा...