spot_img
अहमदनगर'आमदार संग्राम जगताप हेच आमचे लाडके भैय्या'

‘आमदार संग्राम जगताप हेच आमचे लाडके भैय्या’

spot_img

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे
लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमातून महिलांनी केली बक्षीसांची लयलूट
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरात प्रत्येक प्रभागात आमदार संग्रामभैय्या जगताप फाऊंडेशनच्यावतीने लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये युवती-महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच कार्यक्रमानंतर विजेत्या महिलांना भव्य अशी बक्षीसे देण्यात आल्याने महिलांच्या चेरऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, लाडकी बहिण योजनेचे बहिणींचे अर्ज आमदार संग्राम जगताप यांनी भरुन घेत लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिला. लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमातून बहिणींसाठी एक व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे आमदार संग्राम जगताप हेच आमचे लाडके भैय्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे यांच्यासह लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी दिली.

आमदार संग्रामभैय्या जगताप फाऊंडेशनच्यावतीने एक ते सतरा प्रभागासह भिंगार व बुरुडगाव येथे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूतपणे सहभाग नोंदवत बक्षीसांची लयलूट केली. भव्य बक्षीस व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला असल्याच्या प्रतिक्रीया  महिलांमधून व्यक्त केल्या जात आहेत. आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने लाडकी होम मिनिस्टर या कार्यक्रमाची सुरुवात 29 सप्टेंबरपासून करण्यात आली. दि. 29 ऑक्टोबर रोजी प्रभाग एक व सात मध्ये कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रभाग निहाय कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास दिवसेंदिवस गद वाढत गेली. महिलांनी या कार्यक्रमाचा उत्स्फूर्तपणे आनंद लुटला. तसेच बक्षिसांची लयलुट केली. सुझुकी ॲक्सेस, 11 हजारांची पैठणी, फ्रीज, 32 इंच टीव्ही, स्मार्ट वॉच, वॉशिंग मशिन, स्मार्ट फोन, कुलर, गॅस, शेगडी, मायक्रोवेव्ह ओहन, व्हॅक्युम क्लीनर, आटा चक्की, मिक्सर ग्राइंडर या वस्तूंचा बक्षिसामध्ये समावेश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार संग्रामभैय्या सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमात सौ. शीतलताई जगताप यांचा सहभाग
आमदार संग्रामभैय्या जगताप फाऊंडशनच्यावतीने आयोजित केलेल्या लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंद लुटला. तसेच या कार्यक्रमामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सौभाग्यवती शीतलताई जगताप यांनीही सहभाग नोंदवला. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महिलांचा उत्साह वाढला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...