सुपा / नगर सह्याद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांचे २० जानेवारी पासुन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन महामोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान महामोर्चा मध्ये नगर जिल्ह्यात झाकलेल्या एका फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे.
अंतरवली सराटी जालनामधून निघालेला महामोर्चा शाहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे.
महामोर्चाचे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर जंगी स्वागत करण्यात आले. सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान सुपा येथील मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच एका युवा मराठा आंदोलकांच्या हातात ” आमदार – खासदार वाटत आहे चहा, हा तर मराठ्यांचा सोहळा जरा निरखून पहा ” हा फलक आंदोलन स्थळी लक्षवेधी ठरला.