अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भाजपाचे जेष्ठ नेते स्व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन गुरुवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२५ रोजी करण्यात आले असल्याचे माहीती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्हा बॅकेंच्या सहकार सभागृहात सकाळी ११ वाजता ही शोकसभा संपन्न होईल. स्व.आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने भारतीय जनता पक्ष तसेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाने दुखांकिंत झालेल्या सर्वच पक्षांमधील त्यांच्या स्नेहीजनांना त्यांच्या विषयी असलेल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. यासाठी या शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.
स्व.आ.शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या संपूर्ण राजकीय, सामाजिक वाटचालीत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क कायम ठेवला होता. राहुरी- नगर विधानसभा मतदार संघाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे योगदानही मोठे राहीले. जिल्हा सहकारी बॅकेंच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय करुन, बॅकेला लोकाभिमुख चेहरा मिळवून देण्यासाठी त्यांच्या केलेल्या प्रयत्नांची आठवण स्मरणात राहणारी आहे.