spot_img
ब्रेकिंगअजित पवारांच्या जीवाला धोका?, वाचा सविस्तर

अजित पवारांच्या जीवाला धोका?, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र, अजित पवारांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य गृह विभागाच्या सूचनेनंतर यात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अजित पवार आज जनसन्मान यात्रेसाठी जळगाव, धुळे आणि मालेगाव येथे दौर्‍यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागामार्फत अजित पवारांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आहेत. तसंच, पवारांच्या सुरक्षेत मोठी वाढदेखील करण्यात आली आहे. अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत दौरा आम्ही करणारच ना. पोलिसांचे काम आहे सुरक्षा देणे तिथे काही चुकीचं घडू नये याकडे लक्ष देणे, ते याची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

अजित पवार आज जनसन्मान यात्रेसाठी धुळे येथे आहेत. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ताफ्यात ५० पोलीस अधिकारी आणि २५० पोलीस कर्मचारी दौर्‍या दरम्यान बंदोबस्त करणार आहेत. अजित पवारांच्या मेळाव्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खरबदारी घेण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...