मुंबई। नगर सहयाद्री
राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला धक्के पे धक्का बसला आहे. मावळ लोकसभा मतदार संघानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाती बड्या नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन आहे.
आगामी लोकसभेच्या दृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसला आहे. यापूर्वी ही पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश केला होता.
अत्ता मावळचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.