spot_img
राजकारणअमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, 'या' मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, ‘या’ मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभेचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सध्या चांगली रंगू लागली आहे. सध्या शिरूर मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष आहे. याचे कारणही असेच आहे. येथे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांनी शड्डू ठोकले असून ते तेथे कोणता उमेदवार उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शिरुर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही महत्वाचं विधान केलं आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता सुरू आहे. त्यासंदर्भातील अनेक चर्चाही सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. असं विधान करत त्यांनी चर्चेची दारं अजूनही किलकिली असल्याचे सूतोवाच केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सध्या रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...