spot_img
अहमदनगरAhmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला 'इतका'...

Ahmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला ‘इतका’ मोठा घोटाळा

spot_img

श्रीरामपूर : मयत व्यक्तीच्या जागेवर दुसराच व्यक्ती उभा करत, खोट्या दस्तऐवजाचा वापर करत जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला. ही घटना श्रीरामपूरमध्ये घडली.

मारिया वामन प्रभुणे यांनी दीपक सुभाष सुंबे, संतोष वसंत जाधव, अतुल मनोहर भाकरे, मधुसन रमेश खंडेलवाल, जितेंद्र राधामोहन खंडेलवाल, मीना जितेंद्र खंडेलवाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे १९८४ मध्ये सेवानिवृत्त झाले व २० जून २००१ पासून श्रीरामपूर येथून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. फिर्यादीने श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असे जाहीर ठरवून मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता. १८ जानेवारी २०२३ रोजी कोर्टाने फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे यांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे आदेश पारीत केले होते.

असे असताना दीपक सुभाष सुंबे यांनी दुसर्‍याच एका व्यक्तीस वामन किसन प्रभुणे म्हणून उभे केले. त्यांच्या नावाची पिंपळगाव माळवी येथे असलेली जमीन बळकावण्यासाठी खोटे जनरल मुखत्यारपत्र तयार केले.

इतर आरोपींनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात फिर्यादी या वारस नोंदीसाठी गेल्या असता त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...