spot_img
अहमदनगरAhmednagar : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी बरसला ! अनेक ठिकाणी गारपीट, पहा जिल्ह्यातील...

Ahmednagar : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी बरसला ! अनेक ठिकाणी गारपीट, पहा जिल्ह्यातील स्थिती

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. थंडीची चाहूल लागण्याआधीच अवकाळी बरसला. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होताच. काल (दि.२६) रोजी नगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली.

तर काही ठिकाणी पाण्याची गरज होतीच. तेथील पिकांना चांगले वातावरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती कुठे खुशी तर कुठे गम अशी होती. श्रीरामपूर, राहाता, अकोले, पारनेर, राहुरी, नगर शहर, नगर तालुका आदी भागांत जोरदार पाऊस झाला. राहाता शहर व परिसर तसेच शिर्डी व तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला.

अकोले शहर व तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नेवाशात ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संगमनेरमधेही जोरदार पाऊस झाला. सायंकाळी रिमझीम सुरू होती. भंडारदरा, मुळा पाणलोटातही मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचे कळते.

पारनेर तालुक्यालाही रविवारी दुपारनंतर वादळी वार्‍यासह आलेल्या आवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. कांदा, चारा पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, राळेगण थेरपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा नगर शहर आणि तालुक्यात परिसारात ढगाळ वातावरण होते. दुपारी 4 च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. शिरूर, जामखेड तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...