अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातुन एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कटूंबातील ५ जणांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी: नेवासा तालुक्यातील वाकडी गावात सदर घटना घडली आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी एक शोषखड्डा शेतकरी कटूंबानी बनवला होता. त्या शोषखड्ड्यात मांजर पडली होती.
मांजरीला वाचवण्यासाठी एकजण बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला, बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता त्यामुळे त्यात विषारी वायू निर्माण झालेला होता. वाचवण्यासाठी गेलेला एक जण गुदमरून बुड लागला. ते पाहात इतकं चार जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला पण दुर्देवाणे यात पाच जणबुडाले.
पाचजणांचा मृत्यूची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली असून आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे.