spot_img
अहमदनगरAhmednagar Today News: भर लग्न सोहळ्यात दोन ठार, सहा गंभीर, 'धक्कादायक' कृत्याने...

Ahmednagar Today News: भर लग्न सोहळ्यात दोन ठार, सहा गंभीर, ‘धक्कादायक’ कृत्याने ‘वरात’ हादरली

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भर लग्न सोहळ्यात आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोगंर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. बेधुंद झालेल्या डीजे वाहनाच्या चालकाच्या धक्कादायक कृत्याने वरातच हादरली आहे.

लग्न सोहळ्यात नवरदेवाच्या निघालेल्या मिरवणुकीत बेधुंद झालेल्या डीजे वाहन चालकाने अचानक वेग वाढवल्याने त्याखाली मिरवणुकीतील लोक चिरडल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्दैवी घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर डिजे वाहन चालक फरार झाला आहे.

बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ३५, रा. धांदरफळ खुर्द), भास्कर राधु खताळ (वय ६८, रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी मयतांची नावे आहेत. तर रंगनाब दशरथ काळे, अभिजित संतोष ठोंबरे, राजेंद्र भाऊराव कचरे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, बाळकृष्ण तुकाराम खताळ (सर्व रा. धांदरफळ खुर्द) हे जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...