spot_img
अहमदनगरAhmednagar News : गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार, बार असोसिएशनचा...

Ahmednagar News : गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार, बार असोसिएशनचा निर्णय

spot_img

Ahmednagar News : अहमदनगर / नगर सह्याद्री : मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनास व मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणास अहमदनगर शहर बार असोसिएशने जाहीर पाठींबा दिला आहे.

मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण ओबीसी मधूनच मिळावे या मागणीचे निवेदन शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

तसेच तहसीलमध्ये उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची भेट घेवून जाहीर पाठींबा दिला. तसेच गुन्हे दाखल झालेल्या मराठा आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार असा निर्णयही बार असोसिएशनने घेतला आहे.

तत्पूर्वी मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात झालेल्या शहर वकील संघटनेच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना व सकल मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिबा देण्याचा ठराव मांडण्यात आला. तो सर्व वकिलांनी एकमताने मंजूर केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

जेऊर टोलनाक्यावर राडा; पाठलाग करून तरुणावर सपासप वार

राळेगणसिद्धीच्या तिघांवर गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...