spot_img
अहमदनगरअहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर...

अहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर…

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळून मोठी दुर्घटना झाली. ही घटना धांदरफळ शिवारात घडली आहे. दरम्यान या पिकअप मधील चालक व तीन मजूर देखील पाण्यात बुडाले. त्यातील तीन मजूर विहिरीतून बाहेर येण्यास यश आले, परंतु चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. धांदरफळ परिसरातील प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप ही धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आले. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्याने भरधाव वेगाने वाहन चालवले. पुढे गेल्यानंतर त्याने आपले वाहन एका शेतात घातले. मध्यरात्री पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणार्‍या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या वाहनांमध्ये चालकासह तीन मजूर बसलेले होते.

वाळूची रिकामी पिकअप विहिरीत कोसळली. तिन मजुरांनी दोरीच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र पिकअप चालक गोरख खेमनर हा पिकअपसह विहिरीमध्ये बुडाला. विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तालुक्यात वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने बेकायदेशीर आहे. काही वाहनांना कागदपत्रेही नाही. असे असतानाही वाळू वाहतूक करणारे चालक बेदरकारपणे वाळूची वाहतूक करत आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गावात बेकायदेशीर अतिक्रमण, सरपंचाने घेतला आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषदेसमोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा...

युवकावर कोयत्याने हल्ला; अहिल्यानगर मधील घटना

वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर । नगर सहयाद्री: शहरातील जुने कोर्ट जवळ एका...

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

पुणे । नगर सहयाद्री पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना...