spot_img
अहमदनगरAhmednagar News : व्हाट्सअप ग्रुपमधून काढून टाकल्याने दोघांना बेदम मारहाण

Ahmednagar News : व्हाट्सअप ग्रुपमधून काढून टाकल्याने दोघांना बेदम मारहाण

spot_img

अहमदनगर : अहमदनगर शहारत अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसत आहेत. मागील काही दिवसात अशा घटना वाढलेल्या दिसत आहेत. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

चर्चच्या व्हाट्सअप ग्रुपमधून काढून टाकल्याने दोघांना मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात घडली. सॅम्युवेल जॉन खरात व जॉन खरात ते मारहाण झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. शमुवेल प्रसन्न शिंदे व एक अनोळखी व्यक्ती यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सॅम्युवेल जॉन खरात हे मार्केटयार्ड परिसरात असताना शमुवेल प्रसन्न शिंदे व एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना अडवले. चर्चच्या व्हाट्सअप ग्रुपमधून काढून का टाकले असा जाब विचारत त्यांना गजाने मारहाण केली.

या मारहाणीत त्यांची गळ्यातील चैन देखील गहाळ झाली. याच दरम्यान सॅम्युवेलचे वडील जॉन खरात तेथे आले. त्यांनाही या दोघांनी मारहाण केली. फिर्यादीचे मामा श्रीकांत निलकंठ गायकवाड व त्यांचे मित्र सलमान तेथे आले असता आरोपी तेथून पळून गेले. सॅम्युवेल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...