अहमदनगर / नगर सह्याद्री : मोटारसायकल चोरणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. राहुल विजय निकम (वय २४, रा.विळदघाट), बंडू सुदाम बड़े (वय २९, रा.देहरे), अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा.बेलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या तिनी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सात चोरीच्या दुचाकींसह ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटार सायकल चोरी करणार्या आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,
पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे आदींचे पथक नेमून करावी करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, राहुल निकम हा साथीदारांसह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली मोटार सायकल विक्री करण्यास येणार आहे.
पोलिसांनी सापळा लावून राहुल व बंडू या आरोपीना ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा. बेलापूर) यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक, पुणे आदी ठिकाणावरून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या ६ मोटार सायकल व आरोपी अरुण धिरोडे याकडे चोरीची एक मोटार सायकल ताब्यात घेतली.