spot_img
अहमदनगरAhmednagar News : शहरातील १२.५ एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कारवाईस...

Ahmednagar News : शहरातील १२.५ एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कारवाईस सुरवात ! मार्किंग करण्यास सुरवात, शेकडो घरे पडणार?

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर शहरातील १२.५ एकर जमिनीचा ताबा मागील ४७ वर्षातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द ठरवत मूळ वारसांना देण्यासाठी गुरुवारी (दि.१८ जानेवारी) कारवाई करण्यात आली. ही कारवाई सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याचे नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.

या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महसुलचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींच्या मार्गदर्शनखाली नकाशानुसार मार्किंग करण्यात येत होते. त्यानंतर ही जागा मूळ मालकाच्या स्वाधीन केली जाणार आहे. त्यानंतर अतिक्रमणे पडण्याबाबत कारवाई होईल असे समजते. शहरातील सर्व्हे क्रमांक ४६/२, ४७/६, ५९/४, ५१/१, ५२/२, १३३/३ व १३३ येथील १२.५ एकर जागेचा तिघे वादी व पाच प्रतिवादी अशा एकूण ८ जणांना ताबा दिला जाणार आहे.

काय आहे प्रकरण
ममुलाबाई महबूब शेख व तिची मुलगी छोटीबी करीमभाई शेख हे जमिनीचे मूळ मालक होते. त्यांच्यात शेत जमिनीचा हा वाद असून हा वाद विक्री दरम्यान सन १९७७ मध्ये न्यायालयात दाखल झाला. सन २००४ मध्ये त्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी करावेत असे आदेश दिले गेले. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे अपील, त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील या मार्गे सन २००९ मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०१८ मध्ये ६ महिन्यात जागेचे वाटप करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सन २०१९ मध्ये दिलेल्या वाटप आदेशावर पुन्हा जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले. त्यांनी ते फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्याला जमीन खरेदीदार मंगला शरद मुथा यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. परंतु नंतर हसन बाबू झारेकर यांनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात हरकत घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने ४ डिसेंबर २०२३ रोजी ४ महिन्यात वाटप करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी वादी व प्रतिवादी या दोघांना बोलावून वाटप निश्चित केले होते. यामध्ये बुरुडगाव रस्ता ते पुणे रस्ता यादरम्यानच्या पट्ट्यामध्ये भोसले आखाडा, विनायकनगर, चंदन इस्टेट, माणिकनगर, शिल्पा गार्डन या परिसरातील १२.५ एकर जागेचा यात समावेश आहे. या जागेचा ताबा मूळ मालकांना दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये भोसले आखाडा भागातील घोषित झोपडपट्टीचा समावेश तर आहेच शिवाय चंदननगर, माणिकनगर वसाहतीतील टोलेजंग बंगले देखील यात समाविष्ट आहेत.

आयटीआयची २९ गुंठे जागा वगळली
याच जागा वाटपात शहरात ६० वर्षांपूर्वी उभारलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्याही (आयटीआय) जागेचा समावेश आहे. मात्र आयटीआयची २९ गुंठे जागा वाटपातून वगळण्यात आली आहे. सर्वे क्रमांक ४८/६ मधील ही जागा लोकहितार्थ राज्य सरकारने ९ ऑक्टोबर १९६१ मध्ये संपादित केली. नगरच्या तहसीलदारांनी २१ सप्टेंबर १९६३ मध्ये या जागेवर राज्य सरकारचे नाव लावले. त्यामुळे जागा वाटपातून वगळली गेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? मुलावर अनैसर्गिक अत्याचार!, १२ जणांच्या टोळीचे भयंकर कृत्य..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका अल्पवयीन मुलाचे वाहनातून अपहरण करून त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला....

‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी; बचाव कृती समितीचा मोठा निर्णय

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत...

भीषण! वडिलांसह ३ लेकींचा अपघातात मृत्यू, कुठे घडली घटना?

Accident News: तीन मुली अन् बापाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. चौथी मुलगी गंभीर...

अनेकांच्या नशिबात ‘तो’ योग आला?, तुमची रास काय? वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या...