spot_img
अहमदनगरAhmednagar News : मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरमध्ये जंगी सभा ! भुजबळ,...

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरमध्ये जंगी सभा ! भुजबळ, राज ठाकरेंसह अजित पवारांचाही समाचार

spot_img

श्रीगोंदे / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आंदोलने करत असून
आता सरकारने मराठा आरक्षण संदर्भात जे अध्यादेश काढले त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते आजपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्या आधी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरे केले. काल (९ फेब्रुवारी) अहमदनगरमधील श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांना हात घालत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आजपासून उपोषण
सरकारने जो अध्यादेश काढला होता त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असे त्यांनी सांगितले. आजपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा उपोषणाची सुरवात करणार आहे असेही त्यांनी सभेत सांगितले. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली. ते पुढे म्हणाले मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. ते म्हणाले आता रायगडावर जाऊन राज्यांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे. मी असेन नसेन माहीत नाही माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी मराठा बांधवाना केले. येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका
श्रीगोंदे येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा नाव न घेता समाचार घेतला. ते म्हणाले की आता टोळी मुकादम सावध झाला आहे. आतापर्यंत टोळी मुकादमाने पडद्या आडून तीन वेळा मराठ्यांचेआरक्षण घालविले आहे. नाव न घेता तुला अक्कल असती तर जेल मध्ये कांदे खायला गेला नसता, आरक्षण मिळू दे मग झटका दाखवतो असा इशारा त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता इशारा दिला.

आम्ही मॅनेज होणाऱ्यांतले नाहीत, राज ठाकरेंना टोला
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की मुंबईला जाऊन आरक्षण मिळत नसतं असे ते सांगत होते, अरे बाबा आम्ही शांततेत गेलो आंदोलन केलं अन मराठा आरक्षण घेऊनच आलो. आम्ही मॅनेज होणाऱ्यांतले नाहीत असा टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीकास्त्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा तुम्हालाही जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील मराठा आमदारांना फोन करून अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा संमत करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, अन्यथा आमदारांना दारात उभा करू नका असे आवाहन त्यांनी केले.

५१ जेसीबीतून पुष्पवृष्टी
जरांगे पाटील यांच्यावर ५१ जेसीबीतून पुष्पवृत्ती करण्यात आली. आढळगाव येथेही १५ जेसीबी मधून हार फुलांचा वर्षाव करण्यात आला. जरांगे यांची सभा सुरू होण्यापूर्वी शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...