spot_img
ब्रेकिंगसैनिक बँकेत दरोड्यासाठी सराईत ‘शिवा’ होणार हद्दपार!; सैनिकांसह अण्णा हजारेंनाही...

सैनिक बँकेत दरोड्यासाठी सराईत ‘शिवा’ होणार हद्दपार!; सैनिकांसह अण्णा हजारेंनाही…

spot_img

सैनिकांसह अण्णा हजारेंनाही गंडा घालण्यात ठरला माहीर | कर्ज वाटप, नफा खोरी अन् भरतीत खाल्ली मोठी ‘भाड’, तरीही मन भरेना
सारीपाट / शिवाजी शिर्के –
संपूर्ण देशातील माजी सैनिक आणि त्यांच्या कटुंबियांसह नातेवाईकांना आर्थिक हातभार मिळावा या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केंद्र शासनात आपल्या शब्दाचं वजन वापरलं आणि त्यातून देशातील माजी सैनिकांची पहिली बँक नगर जिल्ह्यात आली. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची स्थापना झाल्यानंतर आर्थिक शिस्तीत चालू असणार्‍या या बँकेच्या गत निवडणुकीत कान्हूरच्या ‘शिवा’ने साळसुदपणाचा आव आणला आणि त्याच्यावर विश्वास ठेवत सभासदांनी त्याच्या हाती बँकेची सुत्रे दिली. मात्र, बँकेची सुत्रे हाती घेताच या ‘शिवा’ने त्याच्या लिला दाखवल्या! त्याच्या या लिलांच्या आड जो येईल, त्याला दंडुक्याची भाषा वापरण्यापर्यंत त्याची मजल गेली. रात्रीच्या बैठकीत हाच ‘शिवा’ थेट अण्णा हजारेंचा [ANNA HAJARE] एकेरी नामोल्लेख करत अण्णांचे धोतर फेडू शकतो इथपर्यंतची भाषा वापरु लागला. सभासदांनी समंजस पणाची भूमिका बँकेत या बँकेच्या निवडणुकीत ११ संचालकांच्या जागा बिनविरोध निवडून दिल्या. मात्र, कायम दरोडे टाकणारा आणि आता पुन्हा संचालक मंडळा येऊन टोळीचा म्होरक्या होऊ पाहणार्‍या व्यवहारे यास बिनविरोध निवडून देण्यात सभासदांनी नकार दिला. आता मतदानाच्या माध्यमातून याच शिवासह त्याची पाठराखण करणार्‍या कोरड्यांच्या संजयची टोळी हद्दपार करण्याचा विडा सभासदांनी उचलला असल्याचे दिसते. भ्रष्ट कारभाराने सैनिकांसह अण्णांचे नाव बदनाम करणार्‍या ‘संजय अन् शिवा‘ या दोघांची ‘काळू- बाळू’ची टोळी सभासदांनी हद्दपार केल्यास आश्चर्य वाटू नये!

सहकारी संस्था आणि त्यातील अपप्रवृत्तीमुळे सभासदांचा विश्वास कायमचा उडू लागला असल्याची परिस्थिती सहकारला जन्म घालणार्‍या नगर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी ज्ञानदेव वाफारे याच्या रासलिला आणि त्यातून मायमाऊलींसह अनेकांना कोट्यवधींचा गंडा बसला. त्या धक्क्यातून पतसंस्था चळवळ सावरली नसतानाच पारनेरमधील पतसंस्था चळवळीत पुन्हा एकदा संशयाचे मळभ निर्माण झाले. सैनिक बँकेत शिवा अन् संजय या जोडगोळीने तर काही वर्षांपासून उच्छाद मांडला. कोणाच्याही नावावर कर्ज आणि कोणाचीही जमिन जप्त हे प्रकरण सार्‍यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले. कर्जत शाखेत मोठ्या प्रमाणात ‘लपका’ मारला जात असल्याचे सभासदांनी निदर्शनास आणून दिले असताना त्याच सभासदांना दांडक्याची भाषा वापरणार्‍या संजय अन् शिवा या दोघांच्या दादागिरीचा अनुभव थेट अण्णा हजारे यांना देखील घ्यावा लागला.


बँकेत कर्ज वाटप करताना नियम आणि कागदपत्रे महत्वाची ठरतात! त्यावरच कर्जदार आणि जामिनदार यांची पत पाहिली जाते आणि त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज वाटप करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला जातो. मात्र, या बँकेत तीघांनी मिळून संगनमताने मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज वाटप केले. त्यातूनच बँकेची कलम ८३ नुसार चौकशी आजही सुरू आहे. ही चौकशी दडपण्यासाठी, सभासदांसमोर आपले कृष्णकृत्य येऊ नये या एकमेव उद्देशाने संपूर्ण भ्रष्ट कारभार केलेले व्यवहारे पुन्हा निवडणुकीत उतरले असल्याची जाहीर चर्चा मतदानाला सज्ज झालेल्या सभासदांमध्ये कायम आहे. बँकेतील गैरव्यवहार दडपला जावा म्हणून एकाच दिवशी १ हजार ४०० सभासद करण्याचा विक्रम याच तिघांच्या नावावर नोंदवला गेला आहे. हे सभासद करताना त्यांनी मर्जीतील केले असून काही विकत घेतले असल्याचेही बोलले जाते.

बँकेच्या कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, शाखेचे जुने, फर्निचर, एसी, संगणक, बॅटरी, प्रिंटर, इतर वस्तू परस्पर विकून केलेला पैश्यांचा अपहार व नवीन फर्निचरच्या कामात संगनमताने मिळवलेली टक्केवारीची रक्कम काही कोटीत आहे. मात्र, साळसुदपणाचा आव आणत सभासदांसमोर मतांचा जोगवा मागणार्‍या व्यवहारेची नियम साफ नसल्याचे आता सभासदांनी ताडले असून त्याला बुक्का देतानाच त्याच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश होऊन त्याच्यावर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत गुन्हा दाखल करण्याचा ठराव घेतला जाणार असल्याचे विरोधी मंडळाकडून सांगितले जात आहे. मागील वर्षी सभासदांना नफा वाटणीचा विषय घेतला. मात्र, नफा वाटणीला खो देऊन वेगवेगळ्या खर्चाच्या नावाखाली सर्व पैसे हडप करण्यात याच म्होरक्याचा हात राहिल्याचेही लपून राहिले नाही.

नोकरभरतीतून कमी केलेल्या नातेवाईक, संचालकांच्या मुलांची तीन वेळा पुन्हा पुन्हा नोकरभरतीचा अट्टहास का धरला गेला याचेही उत्तर सर्वश्रूत आहे. या भरतीमध्ये कोणी किती खाल्ले याचे किस्से आजही चर्चेत आहेत. बँकेची स्वत:ची जागा असताना लाखो रूपयांचे कमिशन घेण्यासाठी भाड्याची जागा घेऊन बँकेचे आर्थिक नुकसान कोणामुळे झाले? शहा यांच्या कथीत अहवालात कर्जदार यांचे खात्यावर रक्कम चार्जेस नावे टाकू नयेत म्हणून सहकार आयुक्त यांचे परिपत्रक असताना, सदरची रक्कम वसुली काढलेली असुनही आजपर्यंत कर्जदार यांचे कर्ज खात्यावर बेकायदेशीर वसुली खर्च टाकून कोट्यावधी रुपयांचा अपहार करून कर्जदारांची लुटमार करणार्‍या व्यवहारेसह कोरडे यांच्या टोळीचा पापाचा घडा खर्‍या अर्थाने भरला असल्याचेच आता दिसून येत आहे.

बँकेच्या फसवणूक प्रकरणात सदाशिव फरांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल झाले. दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम त्यांनी हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत ऑडीट रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद असताना त्यांना मोकळीक का देण्यात आली. याच प्रकरणात बँकेचे कर्मचारी निर्दोष असताना त्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केल्याची शेखी व्यवहारे आणि कोरडे मिरवत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळावर कलम ८३ व ८८ नुसार कार्यवाही सुरू आहे. या सर्वांंना बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरले जाणार असून त्यांना बेड्या पडणार आहेत. या बेड्या वाचविण्यासाठीच त्या टोळीचा म्होरक्या या निवडणुकीत उतरला असल्याची चर्चा सभासद करत आहेत.

‘शिवा’च्या भामटेगिरीचा बुरखा सभासदांनी फाडला!
शिवाजी व्यवहारे बँकेला उर्जितावस्थेत आणू शकतात असे गेल्या निवडणुकीत सभासदांना वाटले. मात्र, प्रत्यक्षात त्याने ही बँक लुटली! स्वतःचा स्वार्थ व हित जपणार्‍या त्यांच्या भोवतालच्या लोकांना बरोबर घेत बँकेत त्याने केलेला भ्रष्टाचार लेखापरीक्षण अहवालात बाहेर आला. लेखापरीक्षण अहवाल व ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडीट रिपोर्टमध्ये कोणताही वर्ग दिलेला नसताना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात बँकेला ऑडीट वर्ग अ मिळाला असल्याचे छापून सर्वांचीच दिशाभूल केली. त्याच सभेत सभासदांनी व्यवहारे यास त्याचा जाब विचारला आणि त्याचा भामटा चेहरा समोर आणला. बँकेचे ६ हजार ७९९ समासद सभासद अपात्र करुन निवडणूक जिंकण्याचा डाव शिवा व्यवहारे याने आखला. त्यासाठी बँकेचे पैसे खर्च केले. बँकेचे माजी उपाध्यक्ष व त्याचेच नावकरी असणार्‍या सुकाळे याने त्याच्या मेहुण्यामार्फत खर्च दाखवला. दोन याचिका दाखल केल्या. त्यासाठी बँकेचे पैसे खर्च केले. वास्तविक याच्याशी बँकेचा काहीही संबंध नसताना निवडणुकीत अडथळा ठरणारे सभासद अपात्र करायचे आणि बँकेच्या तिजोरीवर पुन्हा नागोबा म्हणून बसण्याचे शिवाचे स्वप्न आता दिवास्वप्न राहणार असून निकालानंतर त्याच्या हातात हातकड्या पडणार असल्याने आता मतांचा भाव फोडला गेल्याची चर्चा झडू लागली आहे.

बँकेच्या नुकसानीस संचालक जबाबदार; तरीही फौजदारी गुन्ह्यांचा खर्च बँकेतून
सैनिक बँक ही सभासदांची आणि त्यांच्या हितासाठी असताना ही बँक आपली खासगी मालमत्ता असल्याच्या अर्विभावात शिवा आणि संजय या जोडगीळीने मनमानी पद्धतीने ‘हाकली’! त्यातून बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सभासदांनी आवाज उठवला. त्यातून पदाधिकारी आणि काही संचालकांच्या विरोधात अपहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यातून यातील काही पदाधिकारी व संचालकांच्या विरोधात तब्बल सहा फौजदारी गुन्हे दाखल झाले. बँकेला त्याची झळ बसली असताना या सर्वांनी त्यांच्या खर्चाने न्यायालयीन लढाई लढणे अपेक्षीत असताना या सर्वांनी बँकेच्याच खर्चाने ही या लढ्याचा न्यायालयीन खर्च केला. आधीच्या दरोड्यात दोषी ठरवले असताना त्याच दरोड्यातून निसटण्यासाठी या सर्वांनी मिळून पुन्हा बँकेवर दुसरा दरोडा टाकण्याचाच हा प्रकार ठरला!

बँक डबघाईकडे; व्यवहारे-कोरडे-फरांडे मालामाल कसे?
बीस वर्ष बँकेला कोट्यावधी रुपयांचा नफा झाल्याचा अहवालात नोंद असून, नफा वाटणीस सभासदांची मंजुरी घेऊन सभासदांना लाभांश न देता सभासदांची दिशाभूल व फसवणुक केली. आपलेच बगलबच्चे संचालक म्हणून निवडून यावेत यासाठी बँकेतील सर्व सभासद पात्र असताना देखील ७० टक्के सभासद अपात्र ठरविण्यासाठी बँकेच्या पश्याची न्यायालयीन लढाईत या तिघांनीच उधळपट्टी केली. बँकेतील अधिकारी यांच्या पतसंस्थेत सैनिक बँकेतील ठेवी ठेवायच्या! तेथील थकबाकी असणार्‍या कर्जदारांना सैनिक बँकेतून कर्ज देवून बँकेचे नुकसान करण्याचे पाप या तीघांचेच! चेअरमन, मुख्यकार्यकारी संजय कोरडे तिजोरीतील रोख रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असून, बँकेतील काही संचालकांच्या तक्रारीतील चौकशीतून तिजोरीतील कॅश कमी असल्याचे अनेकदा दिसून आले. तरीही व्यवहारे याने संजय कोरडे याला पाठीशी घातले कसे? याचाच अर्थ दोघे मिळून सैनिकांच्या बँकेतील मलिदा खात आहेत. सैनिकांच्या बँकेची गाडी याच चेअरमनने त्याच्या शेतातील टॉमेटा वाहतुकीसाठी वापरल्याची चर्चा आजही कायम आहे. बँकेतून विनातारण कर्ज वाटप करताना त्याच कर्जापैकी लाखो रुपयांची थकित रक्कम असताना त्या कर्जदारांना कोणत्या नियमान्वये लाखो रुपयांची सुट दिली याचे उत्तर गेल्या चार- पाच वर्षात व्यवहारे अथवा कोरडे यांनी दिलेले नाही. बँकेची कोणतीच शाखा वीस वर्षात उघडलीे नाही. बँकेची प्रगती तर झालीच नाही! उलटपक्षी बँक डबघाईकडे गेली असताना उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसणार्‍या व्यवहारे- कोरडे- फरांडे व त्यांना साथ देणार्‍या बँकेतील काही भ्रष्ट अधिकार्‍यांची मालमत्ता कोट्यवधीत कशी गेली हे आता सभासदांनी ओळखले आहे.

पायउतार व्हावे लागणार असल्याचे समजताच
संजय-शिवा यांनी मारला वीस लाखांचा लपका!
सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या जवळपास ११ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरीत जागांसाठी रविवारी, दि. ११ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी बँकेने रितसर सहकार विभागाकडे निवडणुक खर्चापोटीची रक्कम जमा केली आहे. मात्र, असे असताना मतदानाच्या दोन दिवस आधी याच निवडणुकीच्या खर्चाचे कारण देत कोरड्यांच्या संजयसह व्यवहारेंचा शिवा या दोघांनी बँकेतून २० लाख रुपये काढले! वास्तविक पाहता या दोघांना अशी रक्कम काढण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र, आता बँकेत आपली सत्ताच येणार नसल्याचे लक्षात आल्याने दोघांनी जाता-जाता हा वीस लाखांचा लपका मारल्याचे लपून राहिलेेले नाही. याबाबत सभासदांनी थेट सहकार आयुक्तांसह अण्णासाहेब हजारे यांचे लक्ष वेधले असून याच्या चौकशीचे आदेश थेट सहकार आयुक्तांनी दिल्याने संजय- शिवा या जोडीला कडाक्याच्या थंडीत घाम फुटला आहे.

शिवा-संजय अन् राळेगणसिद्धीच्या
‘त्या’ अधिकार्‍याने भरले १३ कर्मचारी!
सैनिक बँकेची आर्थिक घडी विस्कटलेली असताना व कर्मचारी भरतीची गरज नसतानाही बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे, चेअरमन राहिलेले शिवाजी व्यवहारे या दोघांनी बँकेतील राळेगणसिद्धी गावातील एका अधिकार्‍याच्या मार्फतीने स्वत:च्या मर्जीतील अन् शिवा- संजय जोडीच्या ‘पाकीटमारीतील’ तब्बल १३ कर्मचार्‍यांना बँकेत भरती करून घेतले. रात्रीतून झालेली ही भरती आणि त्यातून बँकेवर पडलेला आर्थिक भार यामुळे आधीच हातघाईवर आलेल्या बँकेला मोठी तोषीश सहन करावी लागली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...