अकोले / नगरसह्याद्री : निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करण्यासाठी जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न केला.
अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात संतप्त शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. पाेलिसांनी आंदाेलकांना वेळीच रोखले. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. सध्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने
या कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी एकत्र आले होते. यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखले त्यानंतर मग आंदोलकांनी कालव्याजवळच आपला ठिय्या मांडला होता. जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदाेलकांनी कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे अशी मागणी केली.
यामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत द्यावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली पण शेतकऱ्यांनी काही ऐकले नाही. अखेर पाेलिसांच्या मध्यस्तीने आंदाेलकांत आणि अधिकऱ्यांत चर्चा झाली आहे.