spot_img
अहमदनगरAhmednagar News : पेमराज सारडा महाविद्यालयात परीक्षांबाबत कौन्सिलिंग सेशन

Ahmednagar News : पेमराज सारडा महाविद्यालयात परीक्षांबाबत कौन्सिलिंग सेशन

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात जेईई, नीट,एम.एच.टी-सीईटी आदी परीक्षांबाबत कौन्सिलिंग सेशन आयोजित करण्यात आले होते. शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि.९ डिसेंबर) हे सेशन पार पडले. या सेशनमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी शास्त्र परीक्षेनंतर तंत्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला कसे सामोरे जावे यासंबंधी प्राध्यापक अविनाश झरेकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. झरेकर यांनी आय.आय.टी, एन. आय.टी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सेंट्रल यूनिवर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स,एन.डी.ए आदी जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियांना सामोरे जाताना काय काळजी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन केले.

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेताना प्राप्त झालेल्या गुणांनुसार प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्राधान्यक्रम कसा निश्चित करावा आदी मार्गदर्शन देखील केले. सेशन नंतर पालक व विद्यार्थ्यांचे शंका निरसन देखील केले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित, उप-प्राचार्य डॉक्टर मंगला भोसले, पर्यवेक्षक प्रा.गिरीश पाखरे, डॉक्टर सुजित कुमावत, डॉ. राजू, रिक्कल, प्रबंधक अशोक असेरी, शास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा.मंदार वैद्य यांनी केले.

या उपक्रमाचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष आणि सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन ॲड.अनंत फडणीस,ज्यूनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, संचालक ज्योतीताई कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा आणि ब्रिजलाल सारडा व संचालक मंडळातील इतर मान्यवरांनी कौतुक केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....