spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : कोतवाली पोलिसांची 'दबंग' कामगिरी, शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध धंदे केले...

अहमदनगर ब्रेकिंग : कोतवाली पोलिसांची ‘दबंग’ कामगिरी, शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध धंदे केले उध्वस्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे सुरु असल्याचे अनेक किस्से समोर येत होते. याच वादातून हेरंब कुलकर्णी यांच्यावरही हल्ला झाला होता. आता शाळा-महाविद्यालय परिसरात अतिक्रम करत अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलिसांनी दबंग कारवाई केली आहे. अतिक्रमणे काढत गुन्हे दाखल करण्याची कामगिरी पोलिसांनी केल्यामुळे शाळा महाविद्यालयांनी मोकळा श्वास घेतला आहे.

शाळा-महाविद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष लक्ष घालत विद्यार्थ्यांची अनेक शिबीरे घेतली आहेत. याच परिसरात अतिक्रमणे करून त्या ठिकाणी अवैधरीत्या मावा गुटखा विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या महिन्यात देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने महानगरपालिकेला सोबत घेऊन अतिक्रमाणावर कारवाई केली होती.

मात्र असे असताना पुन्हा अतिक्रमणाने डोके वर काढले होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक शाळांच्या परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी ही अतिक्रमणे हटवत कारवाई केली.

ऋषिकेश मोरे (रा.आदर्श नगर, कल्याण रोड), सीताराम गाडेकर (रा. हिंगणगाव ता. नगर) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य असा १० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईचे विद्यार्थी पालकांकडून स्वागत होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस आमदार तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, अभय कदम, रिंकू काजळे, सलीम शेख, शाहिद शेख, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे आदींनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...