spot_img
अहमदनगरAhmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह 'तो' अट्टल चोर जेरबंद, नगर...

Ahmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह ‘तो’ अट्टल चोर जेरबंद, नगर पोलिसांनी थेट रायगडातून आवळल्या मुसक्या

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोबाईल चोर ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दीड लाखांचे २ आयफोन व १ विवो कंपनीचा फोन जप्त केला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे.   

अधिक माहिती अशी : शुभम कुंडलिक वाफारे (वय २२ वर्षे, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती की, २५ जानेवारीस ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन मुंबई येथे जात असताना त्यांचा कंटेनर केडगाव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्यावेळी चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे  २ अॅपल कंपनीचे फोन, व १ विवो कंपनीचा फोन चोरून नेला होता.

कोतवाली पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डिले, भिमराज खर्स, पोकों/अमृत आढाव आदींचे   पथक तयार करुन पथकास आरोपीचा शोध घेण्याबात सूचना देऊन रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे  वरील आरोपीने चोरी केल्याचे समोर आले. पथकाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी खालापूर, जि. रायगड येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

नेवाशाच्या तरुणावर एट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील...

दारूसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकाला बॅटने मारहाण; नगरमध्ये घडला प्रकार

  ​अमरधाम समोरील धक्कादायक प्रकार; एकावर गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री दारू पिण्यासाठी पैसे देण्यास...

महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकले…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या...

​बुलेटचे ‘फटाके’ फोडणे पडले महागात!; पोलिसांनी काय केले पहा…

​कोतवाली पोलिसांची धडक कारवाई; १० मोटारसायकलींचे सायलेन्सर जप्त, १० हजारांचा दंड वसूल ​अहिल्यानगर / नगर...