spot_img
अहमदनगरAhmednagar News : विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

Ahmednagar News : विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढपाळ संतोष काळूराम बरकडे यांच्या १७० मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी (दि.३० जानेवारी) दुपारी घडली. या घटनेत या शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील संतोष काळूराम बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे मंगळवारी दुपारी १७० मेंढ्यांना अन्नामधून विषबाधा होऊन त्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत.

त्यामुळे मृत मेंढ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून बाहेर काढण्यास सर्वांनी एकजुटीने मदत केली करावी, तसेच या कुटुंबाला सरकारकडूनही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...