spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्ह्याच्या येलो अलर्ट, २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार

अहमदनगर जिल्ह्याच्या येलो अलर्ट, २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री अहमदनगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जिल्ह्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

या दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी समोर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

ही प्रणाली महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेकडे आगेकूच करणार असल्याने पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम सावरूपाचा पाऊस पडेल. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर,

जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीही कमी झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....