Ahmednagar crime : वैरणीच्या जागेच्या कारणावरून दोन कुटुंबातील राडा, नेमकं प्रकरण काय, पहा…
अहमदनगर / नगर सह्याद्री : ahmednagar crime
वैरणीच्या जागेच्या कारणावरून पुतण्याने लाकडी काठीने आणि भावाने लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना आगडगाव ,ता. नगर येथे दि. 24 रोजी दुपारी दोन वाजता घडली.
विक्रम कृष्णाजी बोरुडे वय 50, रा.बोरुडे वस्ती, आगडगाव ,ता. नगर ,असे मारहाण झालेल्यांचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भाऊ मच्छिंद्र कृष्णाजी बोरुडे आणि पुतण्या प्रताप मच्छिंद्र बोरुडे या दोघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे घरासमोर बसलेले असताना त्यांचा मोठा भाऊ मच्छिंद्र व पुतण्या प्रताप हे दोघे तेथे आले. प्रताप याने वैरणीच्या जागेच्या कारणावरून फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. भाऊ मच्छिंद्र याने लोखंडी गजाने मारहाण केली. परत वैरणीची जागा मागितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भादवि कलम 324, 506 सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लबडे करत आहेत.