spot_img
अहमदनगरमानकन्हैय्या नेत्रपेढीद्वारे दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदान-श्रेष्ठदान या विषयावर पोस्टर स्पर्धा

मानकन्हैय्या नेत्रपेढीद्वारे दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदान-श्रेष्ठदान या विषयावर पोस्टर स्पर्धा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :

येथील मानकन्हैय्या नेत्रपेढी व साई सूर्य नेत्रसेवाद्वारे दृष्टीदान दिनानिमित्त ‘नेत्रदान-श्रेष्ठदान’ या विषयावर पोस्टर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

सदर स्पर्धा आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिनाचे औचित्य साधून घेण्यात येत असुन यात शालेय गट व खुला गट असे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी पर्यंतचा शालेय गट असेल व त्यानंतरचा खुला गट असेल. शालेय गटासाठी 15 इंच 22 इंच चे पोस्टर तर खुला गटासाठी 22 इंच 30 इंच आकाराचे पोस्टर तयार करावयाचे आहे. यामध्ये नेत्रदानाविषयी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील कमीत कमी शब्दातील स्लोगन ही असावे व नेत्रदानाची जनजागृती करणार्‍या विचाराशी मिळती जुळती रंगसंगती असावी. भिंतीवर सहजपणे लावता येईल अशी त्याची जाडी असावी. संबंधीतांनी आपले पोस्टर दिनांक 8 जुन 2024 रोजी संध्या 7 वाजेपर्यंत साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर येथे जमा करावे असे संयोजक कळवतात.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 10 जुन 2024 रोजी सकाळी 10 वाजता साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर येथे संपन्न होईल. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे सन्मानपत्र तसेच दोन्ही गटासाठी पहिले बक्षीस रू 3000/-, दुसरे बक्षीस रू 2000/-, तीसरे बक्षीस रू 1000/-, उत्तेजनार्थ (2) रू 500/- असे पारितोषिक असेल असे मानकन्हैय्या नेत्रपेढीद्वारे कळविण्यात येत आहेे.

भारतामध्ये अज्ञान व अंधश्रध्दा मुळे नेत्रदानाचे प्रमाण अल्प आहे व अंध बांधवांची संख्या अधिक आहे. नेत्रदान केल्याशिवाय नेत्ररोपण होऊ शकत नाही व अंध बांधवांना दृष्टी मिळू शकत नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आजपर्यंत आर्टिफिशियल कॉर्निया विज्ञानाच्या प्रयोग शाळेत तयार होऊ शकला नाही. ‘नेत्रदान करणे’ हेच एक अंधत्वावर मात करण्यासाठीचे प्रभावी उपाय आहे. या दृष्टीदान दिवसा निमित्त जास्तीत जास्त व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असे संचालक डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आवाहन केले आहे.
मानकन्हैय्या नेत्रपेढी महाराष्ट्रातील नामवंत नेत्रपेढी असुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने या नेत्रपेढीला उत्कृष्ट कार्य करणारी नेत्रपेढी म्हणून गौरविण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...