spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : नगरसेवक पठारे हल्ला प्रकरणी तिघे अटकेत, हल्ल्याला राजकीय अँगल?...

Ahmednagar Breaking : नगरसेवक पठारे हल्ला प्रकरणी तिघे अटकेत, हल्ल्याला राजकीय अँगल? मोठी अपडेट समोर

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री :
पारनेर नगरपंचायतीचे महायुतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यास पारनेर पोलिसांना यश आले आहे.

जुन्या वादातून नगरसेवक पठारे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे (दोघेही रा.वरखेड मळा, ता.पारनेर), एक अल्पवयीन, महेश राजू खेडेकर (रा.पारनेर), ओमकार गणेश मुळे (रा.देवीभोयरे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी देवेन भारती व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिग्विजय समोरील घटनास्थळी भेट दिली. गुरूवारी (दि १५) सकाळी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नगरसेवक पठारे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रीगर दाबल्यानंतर गोळी कट्टयातच आडकल्याने मोठा अनर्थ टळला. गोळीबार फसल्यानंतर त्या आरोपीने खिशातील चॉपर काढून पठारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पठारे यांच्यासमवेत असलेल्या सहकार्‍यांनी चॉपरने वार करण्याचा प्रयत्नही हाणून पाडला.
पारनेर बसस्थानक परिसरात नगरसेवक पठारे यांचे यशवंत हॉटेल आहे. रोज सकाळी ते हॉटेलबाहेर सहकार्‍यांसमवेत बसतात. शेजारी असलेल्या वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांच्या हॉटेलसमोरही ते बसतात. गुरूवारी सकाळी पठारे काही वेळी त्यांच्या यशवंत हॉटेलसमोर बसल्यानंतर काही वेळाने ते लहू भालेकर यांच्या हॉटेलजवळ जाऊन बसले. पठारे यांच्यासह बापू भालेराव व सतिश पिंपरकर गप्पा मारत होेते.

पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन आरोपी पठारे यांच्याजवळ आला. खिशातील गावठी कट्टा छातीस लावून त्याने गोळीबार करण्यासाठी कटटयाचा स्ट्रिगर दाबला. मात्र स्ट्रिगर दाबल्यानंतर गोळी कटटयातच आडकल्याने गोळीबार होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने दोनदा स्ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला; मात्र केवळ आवाज झाला, गोळी बाहेर आली नाही. हे सुुरू असताना पठारे यांनी आरोपीचा हात झटकला. त्यात गावठी कट्टा जमीनीवर पडला. तो पठारे यांनी त्यांच्या सहकार्‍याकडे दिला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने खिशातील चॉपर काढून पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही पठारे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी हाणून पाडला. आरोपी गोळीबार करीत असताना त्याच्यासोबत पारनेर येथील महेश राजू खेडेकर व देवीभोयरे येथील ओमकार गणेश मुळे दोघे तरूण होते. घटनेनंतर ते पसार झाले.

या घटनेनंतर पठारे यांच्या सहकार्‍यांनी पोलीसांशी संपर्क करून माहीती दिली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने फौजफाटयासह घटनास्थळी धाव घेत आरोपी यास ताब्यात घेतले. पठारे यांच्यावर हल्ला करण्याची तयारी अल्पवयीन आरोपी याने अनेक दिवसांपासून केली होती. त्यासाठी त्याने अलिकडेच ऑनलाईन चॉपरही मागविला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

हल्ल्यासाठी आरोपी पठारेंच्या पाळतीवर..
युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीन आरोपी व त्याचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून पठारे यांच्या पाळतीवर असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी सकाळीही तो त्याच्या साथीदारांसह यशवंत हॉटेलमध्ये येऊन गेला होता. युवराज पठारे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर तालुक्यातून त्यांचे मित्र पारनेरमध्ये दाखल झाले. दिवसभर पारनेर पोलीस ठाणे आवारात पठारे समर्थकांनी गर्दी केली होती.

गावठी कट्टाचे परप्रांतीय कनेशन..
युवराज पठारे यांच्यावर हल्ल्यासाठी आरोपीने सुपा-म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीतील एका बिहारी व्यक्तीकडून घेतला कट्टा विकत घेतल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या औद्योगिक वसाहतीत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आले आहेत. काम करणार्‍या बिहारी व्यक्तीकडून गावठी कटटा घेतल्याचे अल्पवयीन आरोपी सांगत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पाच महिन्यांंपूर्वीचा वाद..
पाच महिन्यांपूर्वी पठारे यांच्या भावकीतील अजिंय राजेंद्र पठारे यांच्या घरी जाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. अजिंक्य यांच्या फिर्यादीवरून संग्राम व गणेश कावरे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. संग्राम याने अजिंक्य पठारे याच्या विरोधातही फिर्याद दाखल केली होती. पुढे अजिंक्य व संग्राम तसेच गणेश यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा राग संग्राम व गणेश यांना होता, त्यातून त्यांनी हे कृत्य घडवून आणल्याचे पठारे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

तुला संपविल्याशिवाय राहणार नाही..
घटनेनंतर पठारे फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाले असता गणेश कावरे याने पठारे यांना फोन करून ‘तू आता वाचला आहेस, तू पोलीस स्टेशनला गेला तर तुला संपविल्याशिवाय राहणार नाही‘ अशी धमकी दिल्याचे पठारे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. गोळीबार तसेच चॉपरचा हल्ला अशस्वी झाल्यानंतर आरोपीला पकडले. त्यानंतर पठारे यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता गणेश कावरे व संग्राम कावरे यांनी मारायला पाठविल्याचे सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

पठारे-कावरे वाद टोकाला..
युवराज पठारे व संदीप कावरे यांच्या स्वतंत्र तालीम सुरू झाल्यानंतर विविध यात्रोत्सवांमध्ये दोघांचेही पैलावान खेळण्यासाठी जात होते. त्यामुळे पठारे व कावरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्याचा राग गणेश व संग्राम कावरे यांना होता. २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीत युवराज पठारे यांनी निवडणूक लढविली असता संग्राम व गणेश यांनी विरोधी उमेदवारासाठी प्रचार केला. मतदान केंंद्रावरही पठारे यांना संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. निवडणुकीनंतर वर्षभराने पठारे हॉटेलजवळ बसलेले असतानाही गणेश कावरे याने शिविगाळ करीत संपवून टाकण्याची धमकी दिली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीला रामराम? दिले संकेत, पुढील वाटचाल…

नाशिक / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही....

अहिल्यानगर मनपाकडून प्रधानमंत्री आवास योजना; आयुक्त म्हणाले भाडे तत्वावर घरकुले..

परवडणाऱ्या किंमतीत सर्वांसाठी घरकुले उभारणार, भाडे तत्वावरही घरकुले उपलब्ध करणार / आयुक्त तथा प्रशासक...

शिंदे गटाच्या आमदाराच्या अडचणी वाढणार? अपक्ष कोर्टात, विजयाला दिलं आव्हान

रायगड / नगर सह्याद्री : रायगड जिल्ह्यातील कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या...

उज्जैन श्री महाकालेश्‍वर मंदिरास नगरच्या व्यापारीकडून 2 किलो चांदीचा मुकुट

नगरच्या भाविकांची उपस्थिती; शहरात साकारण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीसह उत्तम नक्षीकाम असलेले मुकुट अहिल्यानगर / नगर...