spot_img
ब्रेकिंगPolitics News: खासदार जलील सोडणार छत्रपती संभाजीनगर! 'या' मतदार संघात लढवणार 'लोकसभा'

Politics News: खासदार जलील सोडणार छत्रपती संभाजीनगर! ‘या’ मतदार संघात लढवणार ‘लोकसभा’

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शयता वर्तवली जात आहे. जलील उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे आपण मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती खुद्द जलील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईतील एमआयएम नेते-कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत निवडणुकीबाबत विविध मुद्यांवर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी आपल्याला मुंबईतून लढण्याचा आग्रह केला, असे जलील म्हणाले. इम्तियाज जलील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर तेथे तिरंगी लढतीची शयता आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपचे गोपाळ शेट्टी सलग दुसर्‍यांदा (२०१४ आणि २०१९) खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत (२०१९) काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरवले होते. परंतु त्यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र त्याआधी उत्तर मुंबई लोकसभेचा गड दोनवेळा काँग्रेसकडे होता. २००४ मध्ये अभिनेते गोविंदा, तर २००९ मध्ये संजय निरुपम यांनी ही जागा जिंकली होती.

आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पुन्हा काँग्रेसला सुटण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात भाजपचे चार आमदार, तर शिंदेंच्या शिवसेनेचा एक आमदार आहे. काँग्रेसचा एकमेव आमदार अस्लम शेख असून त्यांचेही तळ्यात-मळ्यात असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत होऊ शकते. परिणामी, काँग्रेसलाच मतविभाजनाचा फटका बसू शकतो. कारण गेल्या लोकसभेला शेट्टींनी साडेचार लाखांहून अधिक विक्रमी मताधिय मिळवले होते.

छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला, तरी तो निवडून येईल, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. बदलत्या परिस्थितीत एमआयएम इतर ठिकाणी पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक झाली. १८ तारखेला ओवेसींची अकोल्यात सभा असून त्यावेळी मतदारसंघाबाबत स्पष्ट निर्णय होईल, असेही जलील म्हणाले.

मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघावर एमआयएमचे लक्ष आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, नांदेड, विदर्भातील दोन मतदारसंघ, मराठवाडा आणि मुंबई अशा जवळपास दहा जागांवर एमआयएम लोकसभेची तयारी करत आहे. मुंबईतील मोठे नेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे मुंबईत पक्षविस्तार करत खासदार निवडून देण्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली. आमच्यावर जे कोणी भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत होते, तेच आज भाजपसोबत गेले आहेत. सुरुवातीपासून अशोक चव्हाणसारखे नेते आरएसएससी संबंधित आहेत, फक्त सेयुलरिझमचा बुरखा ओढून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करत खेळ खेळत होते, असा घणाघातही जलील यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...