अहमदनगर। नगर सहयाद्री:-
शेवगाव व पाथर्डी परिसरात घरफोडी करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केली. या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ६ लाख ६३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली आहे.
लखन विजय काळे, गोरख हैनात भोसले, सोनाजी एकनाथ गर्जे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई शेवगाव परिसरातील गेवराई रस्त्यावर करण्यात आली. शेवगांव पोलिस ठत्तण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. महादेव मुरलीधर मुंढे यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली होती.
चोरट्यांनी सुमारे १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्हाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने ही कारवाई केली. सदर आरोपींहे गेवराई रोडवर असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या मुस्क्या आवळला. तर अन्य पसार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.