spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : अवकाळीमुळे पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, पहा कुठे घडली...

Ahmednagar Breaking : अवकाळीमुळे पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, पहा कुठे घडली घटना

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
 पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पोल्ट्री व्यवसाला मोठा फकटा बसला आहे. अवकाळीमुळे ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. आधीच कंपन्याच्या मनमानी पद्धतीने व बाजार भावाच्या अनियमितपणामुळे मेटाकुटीला आलेल्या पोल्ट्री व्यायसायिक शेतकऱ्यांना गारपिटीमुळे एका नवीन संकटाचा सामना करावा लागला आहे.

पांडुरंग पवार (रा.निघोज ता.पारनेर) यांचे ९ हजार पक्ष्यांचे पोल्ट्री शेड आहे. रविवार (दि.२६) सायंकाळी ४ वाजता गारपीट झाली. या गारपिटीने ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत.
वाऱ्याने शेडचे पडदे फाटले. वायररोप तुटून १० ते १२ लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अक्षय म्हस्के (रा.सांगवी सुर्या) व इतर पोल्ट्री व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती पारनेर तालुका अध्यक्ष सर्जेराव भोसले व सचिव राजाराम गजरे यांनी अहमदनगर पशुसंवर्धन उपायुक्त तुबांरे यांना दिली. संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, साळवी व गोंडाबे हे नुकसान भरपाई मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. अहमदनगर जिल्हाध्यक्ष गणेश झावरे, प्रविण धरम, आशिष वामन म्हस्के यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधत सविस्तर माहिती घेतली व संघटनेच्या वतीने  सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...