spot_img
देशबोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे...

बोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे असं झालय? ग्रामस्थांनी काय दावा केलाय पहा

spot_img

नगर सहयाद्री टीम :
Baba Bokhnag devta : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगदा दुर्घटननेत जवळपास सोळावा दिवसापासून मजूर अडकले आहेत. सोळा दिवस उलटूनही त्यांना बाहेर काढण्यात यश येत नाही. अनेक अडथळे या रेस्क्यू मध्ये येत आहेत.

परंतु हे सर्व बोगदा तयार केला जात असल्याने बाबा नाराज झाले आहेत आणि यामुळेच रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होण्यात अडथळा येत आहे, असा दावा ग्रामस्थ करतायेत. बौखनाग देवता नाराज झाले असल्याने, बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या रेस्क्यूत वारंवार अडथळे येत आहेत.

एवढेच नाही तर, जोवर बाबा बौखनाग यांचे पक्के मंदीर बांधले जाणार नाही आणि त्यांची विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा होणार नाही, तोवर रेस्क्यू होऊ शकणार नाही असाही दावा ग्रामस्थ करत आहेत.

बाबा बौखनाग देवतेविषयी –
उत्तरकाशीच्या रेडिटॉप भागात बाबा बोखनाग यांचे मंदिर असून ते परिसराचे संरक्षक मानले जातात. पहाडी भागात असलेल्या त्यांच्या मंदिरात परिसरात दरवर्षी यात्रा भरते.

लोकांना खूप आस्था आहे. येथील प्रत्येक गावात बाबांचे मंदिर असून संपूर्ण परिसराचे संरक्षण तेच करतात व त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बाबा बौखनाग यांची उत्पत्ती सापाच्या रूपात झाली आहे.

मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण टिहरी येथील सेममुखेम येथून येथे आले होते. यामुळे सेममुखेम आणि बाबा बोखनाग यांच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याच्या बरोबर खालूनच बोगदा जात आहे. अशात, त्यांच्या शेपटीखालून बोगदा जाणे हितकारक असू शकत नाही असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...