spot_img
ब्रेकिंगअहमदनगर : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर अखेर मोक्का

अहमदनगर : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर अखेर मोक्का

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : अंकुश चत्तर खून प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर मोक्का दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्वप्नील शिंदेंवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याच्यावर मोक्का दाखल झाला आहे. १५ जुलै २०२३ रोजी नगर शहरातील एकविरा चौकात अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात झाला होता.

त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. विविध स्तरावर याचे पडसाद उमटले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सुरज कांबळे, महेश कुऱ्हे, मिथुन धोत्रे आदींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

यातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर शहरातील आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हे सर्व कुख्यात आरोपी असल्याने यांच्यामुळे समाजालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी असे निवेदनही याआधी देण्यात आले होते.

तसेच पोलिसांनीही स्वप्नील शिंदेंवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता त्याच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...