spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation : २४ नव्हे, १७ तारखेलाच सांगा; मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटलांचा...

Maratha Reservation : २४ नव्हे, १७ तारखेलाच सांगा; मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटलांचा इशारा, काय म्हणाले?

spot_img

छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री –
Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला २४ तारखेपर्यंतचा वेळ दिला होता. परंतु त्यांनी आता १७ तारखेपूर्वीच सरकारने काय निर्णय घेणार, त्याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली, हे १७ तारखेच्या आत आम्हाला कळवावे. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय, असा संशय येत आहे. १७ तारखेला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला. सत्तेतल्या तिन्ही पक्षांनी त्यांचे नेते आमच्याकडे पाठवले होते, त्यांचा पुढे काही संपर्क नाही. सध्या सरकार काय कार्यवाही करत आहे, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. उपोषण सोडण्यावेळी सरकारचे प्रतिनिधी काय म्हणाले होते आणि त्यांनी लेखी आश्वासने काय दिली होती, हे आम्ही जाहीर करणार आहोत. भुजबळांमुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात रोष निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भुजबळ यांचे ऐकून सरकार गोरगरीब पोरांचे वाट्टोळ करत असेल तर ते चूक आहे. पूर्वी ४२ मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आता आणखी आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.

याच दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांचीही पत्रकार परिषद झाली. भुजबळ म्हणाले, जे मराठा आमदार जरांगे यांच्या बाजूने बोलत आहेत, त्यांना त्यांच्या मतांची काळजी आहे. काहीही झाले तरी मी ओबीसींसाठी लढत राहणार. मागील ३५ वर्षांपासून मी ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढत आहे आणि काहीही परिणाम भोगावे लागले तरी मी लढत राहणार.

१७ तारखेला महत्त्वाची बैठक
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी १७ तारखेला मराठा समाजातील धुरिणांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मराठे मुंबईमध्ये आंदोलन करतील, अशी शयता मागच्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात आहे. या आंदोलनाचं स्वरुप कसे असेल, हे १७ तारखेला स्पष्ट होईल.

राज्यातील खासदाराची सोमवारी बैठक; छत्रपती संभाजीराजे यांनी घेतला पुढाकार
मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. सोमवारी (दि. १८) दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने त्यांनी हा पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र पाठविले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले होते. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची दिल्ली येथे त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होणार असून बैठकीस शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...