spot_img
अहमदनगरसाईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय...

साईबाबा भक्तांसाठी महत्वाची बातमी; कोर्टांचा महत्वपूर्ण निर्णय…

spot_img

उच्च न्यायालयाचे निर्देश
शिर्डी / नगर सह्याद्री –
साईबाबा मंदिर दर्शन, आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अहवालाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. आधारकार्ड बंधनकारक केल्यामुळे गैरप्रकार थांबणार असल्याचे बोलले जाते.

न्यायालयाने मंदिर प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दर्शन/आरती पास देण्यासाठी प्रत्येक भक्ताची माहिती घ्यावी. तसेच दर्शन/आरती पासवर आधार क्रमांक नमूद करावा. यामुळे पासची विक्री रोखण्यास मदत होईल.

याशिवाय कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल करून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या याचिकेत त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलीस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालय तिरुपती देवस्थानच्या सुरक्षेचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी तिरुपती देवस्थानकडून गोपनिय अहवाल मागविण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल, असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तो उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान समजला जाईल, असे देखील आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंय काळे काम पाहत आहेत. तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. अमरजित गिरासे, संस्थानच्या वतीने अ‍ॅड. संजय मुंढे काम पाहत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...