spot_img
अहमदनगरAhmednagar: जाळपोळ, तोडफोड! दोन गटात तुफान राडा, ७१ जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar: जाळपोळ, तोडफोड! दोन गटात तुफान राडा, ७१ जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

राहता। नगर सहयाद्री-

दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. एका गटाच्या जमावाने दोन कुटूंबावर जिवघेणा हल्ला करत घराची तोडफोड व दुचाकी व चारचाकी वाहनांचे तोडफोड केली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. 

बुधवारी रात्रीच्या सुमारास सनगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारात मागील भांडणाच्या कारणावरून गावातील संतप्त झालेल्या एका गटाच्या जमावाने दुसऱ्या गटाच्या घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील घोरपडे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, नारायण घोरपडे, सोमनाथ घोरपडे, वनिता घोरपडे, शिवनाथ घोरपडे, शुभम घोरपडे, रोहन निर्मळ, संजय कदम, नंदू निर्मळ, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे, नितीन घोरपडे, दिपक निर्मळ आदींसह ७१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...