spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking : तुरंगातून पळून गेलेले चारही आरोपी जेरबंद, कुठे ? कसे...

Ahmadnagar Breaking : तुरंगातून पळून गेलेले चारही आरोपी जेरबंद, कुठे ? कसे पकडले? पहा थरार

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री : बुधवारी सकाळी संगमनेर मधील कारागृह फोडून चार खतरनाक आरोपी पळून गेले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र पोलीस पथके पाठवत तपास सुरु केला.

अवघ्या तीस तासात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये या चारही आरोपीना ताब्यात घेतले आहे. यातून आता हे आरोपी नेमके पळाले कसे याची मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता.8) भल्या सकाळी संगमनेरचे उपकारागृह फोडून खून, अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपी पळून गेल्याचे वृत्त धडकले. या वृत्ताने पोलिसांसह गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये तीन वर्षांपूर्वी वडगावपानमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी गजाआड असलेला, तालुका पोलिसांचा आरोपी राहुल देवीदास काळे, घारगावच्या हद्दित खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2022 पासून गजाआड असलेला आरोपी मच्छिंद्र मनाजी जाधव, 2021 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अनिल छबू ढोले आणि अन्य दुसर्‍या अत्याचाराच्या कलमान्वये अटकेत असलेला रोशन रमेश दधेल उर्फ थापा यांचा समावेश होता.

या आरोपींमधील दोघांवरील खटले अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत झालेली सुनावणी आणि सरकारी पक्षाने समोर आणलेल्या पुराव्यांचा अंदाज बांधून आपल्याला मोठी शिक्षा होईल अशी धास्ती त्यांच्या मनात निर्माण झाली. प्रदीर्घकाळ गजाआड सडण्यापेक्षा तुरुंग फोडून पळून जाण्यात त्यांनी धन्यता मानली आणि बुधवारी धूम ठोकली, अशी प्राथमिक माहिती आहे.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये रोशन दधेल उर्फ थापा नावाचा आरोपी नेपाळशी संबंधित असल्याने सर्व आरोपी त्याच दिशेने जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांचे संपूर्ण नजर त्याच दिशेने फिरत असतांना आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनात जळगाव जिल्ह्यात बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच जिल्ह्यात असल्याने याबाबत त्यांना सूचना देण्यात आली.

तेथून आरोपी थांबलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून निघाल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपास करत त्यांचा माग काढला आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळ चौघांनाही ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...