spot_img
अहमदनगरअहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

spot_img

जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच बिबट्यांच्या हल्ल्‌‍यात मृत्यू पावलेल्या गायीचा पंचनामा करण्याचीही मागणी केली आहे.

शेतातील गुरांवर हल्ला चढवून 3 बिबट्यांनी एका गायीची शिकार केली. ही घटना जामखेड शहरातील भुतवडा वनपरिक्षेत्रांतर्गतच्या शिवारात सोमवारी (दि.9 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

भुतवडा शिवारातील कोठारी वस्ती येथे राजेंद्र कोठारी यांची शेती असून, शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पंचनामे करावे. तसेच परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी. असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...