spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : संदीप कोतकर यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : संदीप कोतकर यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून नगर शहरात माजी महापौर संदीप कोतकर हे निवडणूक लढविणार किंवा कसे याबाबत उलटसुलट चर्चा चालू होत्या. संदीप कोतकर यांना जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्या निर्णयाच्या विरोधात संदीप कोतकर यांनी अपील केले होते. त्यावर काय निर्णय लागतो याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या होत्या. कोतकर यांच्या अर्जावर अखेर आज निर्णय झाला. त्यानुसार संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात जल्लोष केला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती.

विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर आज यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे.

दरम्यान, कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, संदीप कोतकर यांचे नगर शहरात अनेक वर्षानंतर आगमन होत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यानिमित्ताने संदीप कोतकर हे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार यात शंका नाही.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मविआत ठाकरे गट-काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद, महाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत खळबळ!

मुंबई / नगर सह्याद्री - मविआचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. २३० ते...

आंबेडकरी, मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरणार्यावर कारवाई करा

अन्यथा सोमवारी समाजाचा मोर्चा / पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडाडणार. अहिल्यानगर / नगर सह्याद्री - समस्त आंबेडकरी...

राजकीय वातावरण तापलं! निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का? माजी मंत्री राजीनामा देणार..

  Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बागुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे....

‘आमदार संग्राम जगताप हेच आमचे लाडके भैय्या’

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमातून महिलांनी केली बक्षीसांची लयलूट अहिल्यानगर । नगर...