spot_img
अहमदनगरअहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; 'या' सराईत गुन्हेगाराच्या टोळीवर मोका

अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ सराईत गुन्हेगाराच्या टोळीवर मोका

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कर्जत मार्केटयार्डमध्ये व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून पैश्याची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार विनोद बर्डेच्या टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हेगारी टोळ्यांना हिसका दाखविण्यास सुरुवात केली असून टोळीप्रमुखासह आठ जणांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीप्रमुख विनोद बबन बर्डे आणि त्याच्या साथीदारांनी 18 जानेवारी रोजी कर्जत मार्केटयार्डच्या गेट जवळ एका व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या कब्ज्यातील पैश्याची बॅग बळजबरीने चोरुन नेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी रामराजे प्रुफुल्ल नेटके (रा. भांडेवाडी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासामध्ये सदरचा गुन्हा बर्डे टोळीने केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी टोळीप्रमुख विनोद बबन बर्डे (रा. ता. शिरुर कासार जि. बीड), राहुल दिलीप येवले (रा. ता. शिरुर कासार जि. बीड), शुभम शहादेव धायतडक (रा. ता. पाथड जि. अहिल्यानगर), संदिप बबन बर्डे (रा. ता. शिरुर कासार जि. बीड), बाळासाहेब दगडु बडे (रा. टाकळीमानुर ता. पाथड), यांना अटक करण्यात आली होती. तर त्यांचे साथीदार अमोल सुभाष मंजुळे (रा. ता. कर्जत जि. अहिल्यानगर), भारत येलप्पा फुलमाळी (रा. ता. शिरुर कासार जि. बीड) हनु ऊर्फे हनुमंत गोल्हार (रा. ता. पाथड जि. अहिल्यानगर) हे अद्याप फरार आहे.

टोळीतील आरोपीविरोधात दरोडा, घरफोडी चोरी, अग्नीशस्त्राचा धाक दाखवत लुटणे, खुन, खंडणी अपहरण, अत्याचार, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी वरील आरोपी विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार विनोद बर्डे टोळीतील 8 जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...