spot_img
ब्रेकिंगAhamadanagara: माझी मंत्रालयात ओळख, तुमचे 'ते' काम करतो; 'असा' घातला लाखोंना...

Ahamadanagara: माझी मंत्रालयात ओळख, तुमचे ‘ते’ काम करतो; ‘असा’ घातला लाखोंना गंडा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

आरोग्य विभागात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून मेडिकलचे शिक्षण घेणार्‍या तरूणाकडून दोन लाख ९० हजार रूपये घेतले. नोकरी दिली नाही व घेतलेले पैसेही परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर तरूणाने पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला. अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) रात्री दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सागर भरत मगर (वय २५ रा. देऊळगाव घाट ता. आष्टी, जि. बीड) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे.

फिर्यादीवरून गौरव दादासाहेब नरवडे (रा. खातगाव टाकळी ता. नगर) व प्रवीण तान्हाजी राडे (रा. मुंबई, पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगर हे नगर शहरातील एका कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असून त्यांची गौरव नरवडे याच्याशी ओळख आहे. ८ जून २०२२ रोजी नरवडे हा मगर यांना म्हणाला, माझी ओळख मंत्रालयातील प्रवीण तान्हाजी राडे यांच्याशी असून त्यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे. माझ्याबरोबर तुलाही अरोग्य विभागात नोकरील लावून देतो, असे सांगितले.

८ जूनला मगर व नरवडे हे दोघे राडे याला नगर शहरातील सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे येथे भेटले. त्यावेळी राडे याने मगर यांना सांगितले, की मी मंत्रालयात कामाला असून अनेकांची कामे नेहमी करत असतो. माझी सर्व मंत्र्याशी ओळख आहे. तुमचे दोघांचे काम मी ताबडतोब करून देतो, तुम्ही मला पाच लाख रूपये द्या. मी गौरव नरवडे यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन व माझे सर्व पैसे गौरव नरवडे यांच्याकडे जमा करा’, असे सांगितले.

मगर यांनी विश्वास ठेऊन एक लाख ५० हजार रूपये ऑनलाईन व एक लाख ४० हजार रूपये रोख स्वरूपात असे एकुण दोन लाख ९० हजार रूपये नरवडे याला दिले. नरवडे याने राडे याच्या खात्यावर पैसे पाठविले. राडे याने मगर यांना नोकरीला न लावता व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...