spot_img
ब्रेकिंगकृषी घोटाळा विधीमंडळात गाजला!; ‘नगर सह्याद्री’ची वृत्तमालिका विधान परिषदेत गाजली, सुजित पाटलाच्या...

कृषी घोटाळा विधीमंडळात गाजला!; ‘नगर सह्याद्री’ची वृत्तमालिका विधान परिषदेत गाजली, सुजित पाटलाच्या पापाचा घडा भरला

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्याच्या कृषी उद्योग विकास महामंडळांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधींच्या बोगस निवीदा प्रक्रियेचा मुद्दा अखेर राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात गाजला. महामंडळाच्या माध्यमातून ज्यांच्यावर हा कोट्यवधीच्या घोटाळा झाल्याचा आरोप झाला, त्या सुजित पाटील याचा पापाचा घडा भरल्याचे स्पष्टपणे समोर आले असून या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी करताना सबळ पुराव्यांसह दैनिक नगर सह्याद्रीची वृत्तमालिका असणारे अंक आ. अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत सादर केले. विधान परिषदेच्या सभापती निलम गोर्‍हे यांच्यासमोर सदर प्रकरणाचा भांडाफोड झाला! आता या प्रकरणात राज्य शासन काय भूमिका सभागृहात सादर करते याकडे लक्ष लागले आहे.

कृषी उद्योग विकास महामंडळाचा एकछत्री कारभार सांभाळणार्‍या सुजित पाटील याच्या कारनाम्यांमुुळे राज्यातील शेतकर्‍यांसाठीच्या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लुट करण्यात आल्याची वृत्तमालिका नगर सह्याद्रीने प्रकाशित केले. याबाबतचे पुरावे देखील या वृत्तमालिकेत मांडले. अधिवेनश चालू असतानाच कृषी विभागातील हा घोटाळा समोर आला आणि राज्यातील शेतकर्‍यांमध्ये महायुतीच्या सरकारविरोधात असंतोषाचा भडका उडाला. देेवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यातील शेतकर्‍यांसाठी विविध लाभाच्या योजनांचा लाभ देताना वस्तू स्वरुपात न देता त्या वस्तुंच्या किमतीचे अनुदान थेट शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, असे असताना सुजित पाटील याने त्याच्या मर्जीनुसार स्वत:च्या व्यक्तीगत फायद्यासाठी या योजनेत बदल केले आणि राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुरवठादारांच्या हिताचे निर्णय घेत शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा न करता ही रक्कम पुरवठादाराच्या घशात घालत मोठी टक्केवारी मिळवली. हे सारे पुराव्यानिशी नगर सह्याद्रीने मांडले.

दरम्यान, सदर वृत्तमालिकेची चर्चा संपूर्ण राज्यात झाली आणि शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होऊ लागला. राज्याचा कृषीमंत्री मीच ठरवत असल्याने माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही, अशी दर्पोक्तीची वल्गना करण्यापर्यंत सुजित पाटील याची मजल गेली. त्यामुळे या पाटीलच्या विरोधात कोणीच बोलायची हिंमत करत नव्हते. मात्र, त्याचे संपूर्ण कारनामे आणि त्याचे पुरावे हाती आल्यानंतर ‘नगर सह्याद्री’ ने सलग पाच दिवस वृत्तमालिका प्रकाशित केली आणि सुजित पाटलामुळे राज्याचे कोट्यवधींचे कसे नुकसान झाले याचा पंचनामाच केला.

दरम्यान, सदर वृत्तमालिकेची दखल घेत राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला आणि शेतकर्‍यांना कसे फसवले जाते याचे पुरावेच मांडले. जोडीने ‘नगर सह्याद्री’च्या अंकाची वृत्तमालिका देखील विधान परिषदेत फडकावली गेली. कोट्यवधींचा गफला करत शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या अशा अधिकार्‍यांचे काय करणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. विधान परिषदेच्या सभापती निलम गोर्‍हे यांनी आ. वंजारी यांचे निवेदन समजून घेतले आहे. आता या प्रकरणात कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सभागृहात काय भूमिका मांडतात याकडे राज्यातील शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

देवेंद्रजी अन् मुंडे साहेब,
पापाचे धनी होऊ नका!
कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूंची खरेदी न करता त्या वस्तू बाजारातून शेतकर्‍यांनी खरेदी करण्याची आणि त्यासाठी विशिष्ट रक्कम शेतकर्‍यांना अनुदान म्हणून देण्याची महत्वाकांक्षी योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी विभागाने योजना तयार केली आणि शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागली. मात्र, महामंडळातील सुजित पाटील याच्या पदरात यातून काहीच पडत नव्हते. याआधी याच योजनेच्या माध्यमातून पुरवठादारांना हाताशी धरत जिभेला रक्त लागलेल्या पाटील याचे पित्त खवळले आणि त्याने ही योजनाच बंद पाडली. कागद आणि नियमांची मोडतोड करत त्याने पुरवठादारांच्या हिताचा निर्णय घेतला. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा घालणार्‍या सुजित पाटील याच्यावर काय कारवाई होणार याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही या घोटाळ्यामुळे मोठी गोची झाली आहे. खरेतर हे पाप सुजित पाटील याचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री मुंडे यांच्याकडून याच सुजित पाटील याच्यावर कारवाई होणार की त्याच्या पापाला पाठीशी घातले जाणार याकडे राज्यातील शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील...

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...