spot_img
अहमदनगरAhmednagar News: शेतकरी आक्रमक! बाजार समितीतील कांदा लिलाव पाडला बंद

Ahmednagar News: शेतकरी आक्रमक! बाजार समितीतील कांदा लिलाव पाडला बंद

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या नंतर पारनेर बाजार समितीत रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकर्‍यांनी कामगार नेते शिवाजी औटी यांच्या नेतृत्वाखाली कांदा लिलाव बंद पाडले.

केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी पारनेर बाजार समितीत कांदा चे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये किलो ला भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपये पर्यंत गडगडले, यामुळे कामगार नेते शिवाजी औटी यांच्या सह शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत दाखल झाले.

त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी भिकाजी जगदाळे, शेतकरी संघटनेचे मुरलीधर जगदाळे, पांडुरंग ढवळे, महेंद्र पांढरकर, राजकुमार मोरे, पांडुरंग पडवळ, कैलास चौधरी, अण्णा मोरे, अर्जुन गंधाकते , ज्ञानदेव पानसरे, भाऊ बोरूडे,पोपट मोरे, शिवाजी गंधाकते, संतोष कावरे आदी सह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी सभापती बाबाजी तरटे, सचिव सुरेश आढाव,संचालक चंदन भळगट, नंदकुमार देशमुख ,किसन गंधाडे, तुकाराम पडवळ, संतोष दिघे, यांनी पारनेर बाजार समिती शेतकर्‍यांन बरोबर असून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णयचा निषेध केला. दरम्यान शेतकरी व सभापती, व्यापारी यांच्या चर्चे नंतर पुन्हा लिलाव सुरू करण्यात आले.

शेतकरी व व्यापारी दोन्ही अडचणींत

कांदा निर्यात बंदी चा केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतल्याने शेतकरी व व्यापारी दोन्ही अडचणींत सापडले आहेत. कांद्याचे भाव गडगडले आहे. तातडीने निर्यात बंदी उठवली पाहिजे.
-मारूती रेपाळे, अध्यक्ष, पारनेर तालुका व्यापारी संघटना

बाजार समिती शेतकर्‍यांबरोबर

पारनेर बाजार समिती शेतकर्‍यांबरोबर आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो. शेतकर्‍यांचे म्हणणे असेल तर बुधवारी कांदा लिलाव बंद ठेवू मात्र कांदा खराब होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये याचा विचार करावा.

-बाबाजी तरटे, सभापती बाजार समिती

निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा लिलाव बेमुदत बंद

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या मुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पारनेर तालुक्यात तर एकीकडे गारपीट मुळे काही भागातील कांदा चे नुकसान झाले दुसरीकडे आता भाव गडगडले मुळें शेतकरांचे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवू.

-शिवाजी औटी, कामगार संघटना नेते

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

सोलापूर / नगर सह्याद्री - Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड....

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती  संगमनेर | नगर सह्याद्री बांगलादेशात काही महिन्यांपासून...

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

जामखेड | नगर सह्याद्री जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून...