spot_img
अहमदनगरParner News: सळईने भरलेला ट्रक घरात घुसला! ग्रामस्थ आक्रमक, घेतली 'ही' भुमिका

Parner News: सळईने भरलेला ट्रक घरात घुसला! ग्रामस्थ आक्रमक, घेतली ‘ही’ भुमिका

spot_img

सुपा | नगर सह्याद्री-
नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण मध्ये सोमवार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजता सळईने भरलेला ट्रक गावातील घरावरती, लाईटच्या पोलवर जाऊन आदळला यामध्ये गाडी ड्रायव्हर सळईबरोबर काचेतुन बाहेर पडला.

ड्रायव्हर बेशुद्ध अवस्थेत पडला त्याला रूग्णालयात हलवण्यात आले आहे. गावातील लाईटचा पोलला गाडी आदळल्यामुळे पोल वाकला असून गावातील वीज पुरवठा खंडित झाला. ग्रामस्थ पहाटे गाड झोपेत असताना मोठ्याने आवाज झाल्यामुळे कुटुंबातील संगीता शेळके यांना खुप मोठा धक्का बसला आहे. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सकाळी या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थी उभे असतात. सुदैवाने धोका टळला आहे, तरीपण प्रशासनाला कधी जाग येणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगव्हाण मधील प्रलंबित कामे सुरू करावे यासाठी रविवारी ग्रामस्थांनी गावामध्ये सह्यांची मोहीम सुरू आहे. सोमवारी १८ तारखेला सा. बा.विभागाला चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्यासंदर्भात ग्रामस्थ सामुहिक निवेदन देणार आहेत. नारायणगव्हाणकरांनी नगर पुणे महामार्गासह नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी सातत्याने लढा देवुन रस्ता सुरक्षेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

सदर लढ्यांमुळे प्रलंबित ९४५ मीटरपैकी ८१५ मीटर काम पूर्ण झाले परंतु १३० मी कामासाठी गावाला वेठीस धरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता गावकर्‍यांसमोर रास्तोरोको शिवाय दुसरा पर्याय नाही. जर १८ तारखेच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर २ जागेवारीला गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

नारायणगव्हाणकर जिव मुठीत धरून जीवन जगत आहेत. प्रशासनाला परिस्थितीच गांभिर्य नाही. एकाच घरावर तिन वेळा मोठमोठ्या गाड्या घुसल्या भितिपोटी रस्त्यालगतच्या ग्रामस्थांनी घर सोडली. झोपेच सोंग करणार्‍या प्रशासनाला जाग करण्यासाठी हतबल होवुन ग्रामस्थांनी गावात गाव बंद व नगर – पुणे महामार्गावर रास्ता रोक करण्यासाठी सह्यांची मोहीम सुरु केली असुन रस्त्याचे काम सुरु झाल्याशिवाय ग्रामस्थ आता हटणार नाहीत.

– शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...